श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अजिंक्य

- होली क्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलवर एकतर्फी मात - कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 17 वर्ष मुली क्रिकेट स्पर्धा उत्साहात 

 श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अजिंक्य

– होली क्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलवर एकतर्फी मात

-कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 17 वर्ष मुली क्रिकेट स्पर्धा उत्साहात 

(कोल्हापूर : दि. 28 oct 2024) : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)

मेरी वेदर मैदान सुरु असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित आणि कोल्हापूर क्रिकेट अंपायर असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्याने कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 17 वर्ष मुली क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात  श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने होली क्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलवर एकतर्फी विजय संपादन करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने होली क्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलवर एकतर्फी विजयी

 अंतिम सामना श्री साई हायस्कूल व होलीक्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल यांच्यामध्ये झाला . यामध्ये श्री साई हायस्कूलने टॉस जिंकून कर्णधार श्रावणी पाटील हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . यामध्ये श्री साई हायस्कूलने ८ षटकात १५१ धावा केल्या यामध्ये अनुक्रमे कु सुहानी कहांडळ हिने ६७ धावा व परिनिता पाटील हिने ५० धावा करून आपली अर्धशतके पूर्ण केली. उत्तरादाखल हॉली क्रॉस हायस्कूल संघ १८ धावा करू शकला . यामध्ये मालिकावीर म्हणून सुहानी कहांडळ हिला घोषित करण्यात आले. तिने तीन सामन्यात १७३ धावा व दोन विकेट घेतल्या तर परिनिता पाटील हिने ९८ धावा व ५ विकेट घेतल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित केले. श्रावणी पाटील , संस्कृती रसाळे , जान्हवी चौगुले , स्नेहा पटेल यांनी उत्कृष्ठ गोलंदाजी केली. तत्पूर्वी, झालेल्या सामन्यात श्री साई हायस्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूल व संजीवन इंटनॅशनल स्कूल वरती एकतर्फी विजय प्राप्त केला.

विजयी साई हायस्कूल संघ :

श्रावणी पाटील (कर्णधार ), समिक्षा पाटील , प्राची कांबळे ,परिनिता पाटील , सुहानी कहांडळ ,श्रृतिका पाटील ,अनघा पिसे ,स्नेहा पटेल, वेदिका पाटील ,संस्कृती रसाळे ,प्राची पाटील ,तन्वी खळदकर , जान्हवी चौगुले , सई वेल्हाळ ,साक्षी पोतदार ,सानिका नाईक क्रीडा शिक्षक सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार.

सदर स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे मार्गदर्शनानुसार मनपास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. सदर स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शिवाजी कमते, सरदार पाटील यांनी केले.

You may also like

error: Content is protected !!