निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखत “महाराष्ट्र” अजिंक्य
– डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सवर 4 – 0 गोलने एकतर्फी मात
– कोल्हापूर मनपास्तर (19 वर्षाखालील मुले गट) शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा
– महाराष्ट्राची विभागीय स्पर्धेसाठी निवड
_- 19 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत तृतीय तर 17 वर्षे खालील फुटबॉल स्पर्धेत द्वितीय फेरीत धडक_
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धेत निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र हायस्कूलने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात महाराष्ट्रने डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सवर 4 – 0 गोलने एकतर्फी मात करून स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले.
डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
तर सौ. स.म. लोहिया हायस्कूलने न्यू कॉलेजवर 2 – 0 गोलने मात करून तृतीय क्रमांक पटकाविला.
या विजयामुळे महाराष्ट्राची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरू आहेत.
अंतिम सामना :
निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने विजयविरुद्ध डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सवर 4-0 गोलने एकतर्फी मात केली. महाराष्ट्र हायस्कूल कडून सर्वेश वाडकर 2, स्वराज सावंत व प्रमोद नरळे यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयाबरोबर महाराष्ट्र हायस्कूल संघाने स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले. या विजयाबरोबरच महाराष्ट्र हायस्कूलची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ…
अविराज पाटील, रेहान मुजावर, मुस्तफा फरास, विराज पाटील, स्वराज सावंत, अथर्व पाटील, अभयसिंह पाटील, कृष्णात मिसाळ, सर्वेश वाडकर, सौरभ ढाले, गंधर्व घाटगे, आयुष राणे, पार्थ पाटील, स्मित पार्टी, हर्षवर्धन मिस्त्री, जैद शेख, प्रमोद नरळे, सिद्धेश पाटील, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील, संतोष पोवार, शरद मेढे, सुर्यादिप माने, सुर्याजित घोरपडे.
19 वर्ष मुले स्पर्धा निकाल :*
सेमी 1.
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने सौ स म लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेजवर 4-0 गोलने एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्रकडून सर्वेश वाडकरने 2, गंधर्व घाटगे व सौरभ ढाले यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सेमी 2.
डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्सने न्यू कॉलेजवर 1-0 गोलने मात केली. कॉमर्स कॉलेजकडून अथर्व हांडे याने एकमेव गोल नोंदविला.
——- —————————————
——- —————————————
मनपा आयोजित शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. 13) झालेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये सौ. स. म. लोहिया हायस्कूलने 19 व 17 वर्षाखालील गटात यश संपादन केले.
तृतीय क्रमांक : सौ. स.म. लोहिया हायस्कूल
19 वर्षाखालील मुलांच्या गटात_ झालेल्या फुटबॉल स्पर्धेत सौ. स.म. लोहिया हायस्कूलने न्यू कॉलेजवर 2 – 0 गोलने मात केली. या सामन्यात सौ. स.म. लोहिया हायस्कूल वेदांत तिवले याने मैदानी 2 गोल करून संघाला मजबूत आघाडी मिळवून देत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयाबरोबर शाळेने तृतीय क्रमांकावर शिक्कामोर्तब केले.
तसेच _17 वर्षाखालील मुलांच्या गटात_ व.ज. देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलवर सौ. स.म. लोहिया हायस्कूलने 2 – 0 गोलने विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. या सामन्यात सौ. स.म. लोहिया हायस्कूलच्या श्रेयस आयरेकर व आशुतोष कांबळे यांनी प्रत्येकी एक मैदानी गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
उद्याचे सामने : 17 वर्ष मुले गट. (शनिवार दि. 14.9.2024.)…
यांनी केले आयोजन
सदर स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, उप आयुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे मार्गदर्शनानुसार मनपास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. स्पर्धा आयोजनाचा कामकाज शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.
बक्षिस समारंभ :
सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक सामना विजयी संघास आकर्षक ट्रॉफी दिली. बक्षीस समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य एस एन इनामदार, पर्यवेक्षक एस ए जाधव, शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर, सॉकर रेफ्री असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा विभाग प्रमुख वी जी चोपडे, कोल्हापूर ATHLETICS असोसिएशन सेक्रेटरी प्रा प्रकुल मांगोरे पाटील, स्वप्निल पार्टे, क्रीडा शिक्षक सचिन शिंदे आदी उपस्थित.