“एक राखी” पत्रकार बंधूंसाठी..!
– प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राबविला आदर्शवत अनोखा “रक्षाबंधन” उपक्रम : उपक्रमाचे दुसरे वर्ष
– पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव
– 140 वर्षांची जोपसली शैक्षणिक परंपरा..
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
सामाजिक, शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या पत्रकारांना प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून “रक्षाबंधन” हा
सण उत्साहात साजरा केला. निमित्त होते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आयोजित “एक राखी” पत्रकार बंधूंसाठी..! या उपक्रमाचे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या “पत्रकार बांधवांसाठी रक्षाबंधन” हा उपक्रम प्रायव्हेट हायस्कूल मध्ये मंगळवारी (दि. 20) राबविण्यात आला.
– एक वेगळा आदर्श घालून दिला..
या उपक्रमात सहभागी पत्रकारांना एनसीसीच्या एअर विंग, आर्मी बटालियन तसेच नुकत्याच 18 वी राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनीनी राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थिनींनी सुबक व आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या लक्षवेधी आकर्षक रांगोळीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थिनींनी पत्रकारांना आरतीने ओवाळून औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे कार्य केले. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने पालकवर्ग, समाजासह विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
– यंदाचे उपक्रमाचे दुसरे वर्ष
दरवर्षी शालेय विद्यार्थिनी मार्फत हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे उपक्रमाचे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी वृत्तपत्रात कार्य करणाऱ्या छायाचित्रकारांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला होता. तर यंदाच्या वर्षी या उपक्रमांतर्गत सामाजिक व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पत्रकारांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
– 140 वर्षांची जोपसली शैक्षणिक परंपरा..
140 वर्षांची शैक्षणिक परंपरा जोपसलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये “एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी” असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम व पत्रकारांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. यासाठी एनसीसीच्या एअर विंग आणि आर्मी बटालियन तसेच नुकत्याच 18 वी राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनीनी उपस्थित पत्रकारांना व संस्थेतील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. पत्रकारांनी विद्यार्थिनींना स्वरक्षण करण्याबरोबरच शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी आशीर्वाद दिले.
– राखी तयार करण्याची कार्यशाळा..
दरवर्षी प्रशालेमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा घेतली जाते. यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आकर्षक राख्या बनवितात. आणि या तयार झालेल्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवल्या जातात.
– गेल्यावर्षी छायाचित्रकारांचा गौरव..
गेल्यावर्षीपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम प्रशालेत साजरा केला जातो. यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे राखी बांधून औक्षण केले जाते. गतवर्षी शहरातील प्रमुख वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स व सोशलमीडिया प्रसार माध्यमातील विविध छायाचित्रकारांचा गौरव करून प्रशालेतील विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून “रक्षाबंधन” उपक्रम राबवून भाऊ – बहिणीचा सण उत्साहात साजरा केला होता. यंदाचे उपक्रमाचे दुसरे वर्ष असून यावर्षी “सर्व मीडियातील सामाजिक व शिक्षण विभागात” काम करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करून राखी बांधून औक्षण करण्यात आले.
– सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात वृत्तांकनाचे उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान
कला विभागप्रमुख प्रशांत जाधव यांच्या संकल्पनेतून व प्र, मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे नियमक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर, व्हाईस चेअरमन डाॅ. सुनील कुबेर, नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरुण डोंगरे, कार्यवाह शरयू डिंगणकर, कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर यांच्या हस्ते उपस्थित सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वृत्तांकनाचे काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानपत्र, स्नेहभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये “लोकमानस न्यूज 4” वेब पोर्टलचे विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली, “महाराष्ट्र न्यूज वन” चे वरिष्ठ पत्रकार सतीश घाटगे, एस न्युज चॅनलचे पत्रकार संगम कांबळे, कॅमेरामन केदार भोसले, स्पीड न्यूजचे पोपट पाटील, ज्येष्ठ छायाचित्रकार राज मकानदार, “लोकमानस न्यूज 4” चे पत्रकार सुनील थोरवत, पत्रकार रणजीत हर्णे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाप्रसंगी वरीष्ठ पत्रकार सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
– रोलबॉल स्पर्धा विजेत्या मुलींच्या संघाचा सत्कार
बुलढाणा येथे झालेल्या 18 व्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेतील प्रशालेच्या विजेत्या मुलींच्या संघाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विजेत्या मुलींच्या संघातील खेळाडूंची नावे अशी, कर्णधार अवनी महाडिक, उपकर्णधार व गोलकिपर जान्हवी निंबाळकर, स्वरा निंबाळकर, सानिया बागवान, प्रेरणा येडूरकर, आदिती शिंगरे, अनुश्री कोणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मुले गट : – आरुष महाडीक, अर्नव महाडीक, कौस्तुभ हरणे, राजवीर काळे. प्रशिक्षक अपर्णा विनय महाडिक, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक डी बी पाटील.
– यांचे विशेष योगदान..
या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन व प्रस्तावना व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. जिमखाना प्रमुख संतोष गनबावले यांनी आभार प्रदर्शन केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप पाटील, राजेंद्र जाधव, जगदीश जोशी, डी.एम रेडेकर, सुनील गोंधळी, श्रीमती एस. एस. माने यांचे विशेष योगदान दिले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.