“रणधीर” चा अनपेक्षित मृत्यू.. चटका लावणारा..!

- खराडे कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

“रणधीर” चा अनपेक्षित मृत्यू.. चटका लावणारा..!

– अचानक एक्झिट झाल्याने नातेवाईकासह मित्रपरिवारालाही बसला धक्का

– खराडे कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

– धाडसी व शारीरिक दृष्ट्या धडधाकट असणाऱ्या रणधीरला अवघ्या ५० व्या वर्षीच मृत्यूने गाठले

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी).

जोपर्यंत सोबत आहात.. तोपर्यंत एकमेकांना समजून घेत चला.. जर दूर झालो तर.. आठवणी शिवाय काहीच उरत नाही.. अशा आशयाचा अखेरचा “गुड मॉर्निंग” चा मेसेज रणधीरने “एमएचएसके सुपर ११” या ग्रुप वर पाठवला होता. आणि अवघ्या काही दिवसातच दररोजच्या व्यायामात असणाऱ्या, खिलाडूवृत्तीच्या, बोलण्या- चालण्यातील “रणधीर”चा चटका लावणारा अनपेक्षित मृत्यू झाला. धाडसी व शारीरिक दृष्ट्या धडधाकट असणाऱ्या रणधीरला अवघ्या ५० व्या वर्षीच मृत्यूने गाठले. अचानक एक्झिट झाल्याने नातेवाईकासह मित्रपरिवारालाही मोठा बसला धक्का बसला. तर कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई – वडील, दोन विवाहित भाऊ असा मोठा परिवार आहे.

– ग्रुपचा “गेट-टुगेदर” घडवून आणण्यासाठी पुढाकार

रणधीरची महाराष्ट्र हायस्कूल शाळेतील 1988 – 89 सालातील दहावी “ड”ची बॅज. त्यांच्या पुढाकाराने या बॅजमधील फुटबॉल खेळाडूंचा “एमएचएसके सुपर इलेव्हन” या नावाने ग्रुप काढण्यात आला आहे. यामध्ये रणधीर खराडेसह सुकुमार लाड, नंदकुमार तेली, राजू हांडे, सतीश चौगुले, संदीप इंगवले, डॉ. संग्राम मोरे, मनोज काटे, गजानन घोसरवाडे, ऋषिकेश साळुंखे, रवींद्र साळोखे आदींचा समावेश होता. रणवीरच्या अचानक “एक्झिट”मुळे आता हा ग्रुप दहा जणांचा उरला आहे. या ग्रुपचा गेट-टुगेदर घडवून आणण्यासाठी नेहमीच त्याचा पुढाकार असायचा. याबद्दल ग्रुप मधून त्याचे कौतुक ही केले जायचे. त्याच्या अचानक जाण्याने मित्रपरिवाराला धक्काच बसला आहे.

 

– सैन्य दलात व पोलीस अधिकारी बनण्याचे ठेवले होते लक्ष…

शालेय जीवनापासूनच रणधीरने एनसीसी करून सैन्य दलात नोकरी करण्याचे लक्ष ठेवले होते. न्यू कॉलेजमध्ये बीएससीची पदवी घेतल्यानंतर त्याने सैन्यदल व पोलीस अधिकारी बनण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले. यासाठी त्याने स्पर्धा परीक्षा केंद्रावर जाऊन अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याच क्षेत्रात करिअर करणारे मित्र सर्कल केले. त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी व्यायामशाळेसह मैदानावरील सराव सुरू ठेवला. शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या रणधीरला मात्र, या प्रयत्नांमध्ये अपयश आले. याने खचून न जाता त्यानंतर त्याने न्यू कॉलेजमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. आपल्या बोलक्या व चांगल्या स्वभावाने त्याने नातेसंबंध जपत राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मोठा मित्रवर्ग जमविला होता.

 

You may also like

error: Content is protected !!