“काँग ऊन” विद्यापीठाची ऋतुजा मांडवकर यांना “पीएचडी”

- "इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग" मधील यशस्वी कामगिरी

“काँग ऊन” विद्यापीठाची ऋतुजा मांडवकर यांना “पीएचडी”

– “इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग” मधील यशस्वी कामगिरी

कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

दक्षिण कोरियातील काँग ऊन विद्यापीठाने ऋतुजा राजेंद्र मांडवकर यांना “इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग” मधील पीएचडी पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल तिच्यावर मित्रपरिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

राजारामपुरी अकरावी गल्ली येथील ऋतुजा यांना दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे झालेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ही पदवी प्रदान करण्यात आली. ऋतुजा ही दै. पुढारीचे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर व राजश्री मांडवकर यांची मुलगी आहे. ऋतुजा यांनी “सिनर्जेटिक हायब्रीडायझेशन ऑफ व्हेरियस मटेरियल फॉर इम्प्रुड फोटोकॅरियर इंजेक्शन इन फोटो डिटेक्शन सरफेस इन्हान्स रामन स्पेक्ट्रोस्कोपी” या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्यांना प्रो.जी. हुन लि यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागात झाले आहे.

You may also like

error: Content is protected !!