मनशांतीला अधिक महत्व

- ब्रम्हाकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय वक्त्या राजयोगिनी डॉ.बी.के सुनिता दीदी यांचे प्रतिपादन

मनशांतीला अधिक महत्व

– ब्रम्हाकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय वक्त्या राजयोगिनी डॉ.बी.के सुनिता दीदी यांचे प्रतिपादन

– रोटरीच्या “आशाये“ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विविध तज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” विषेश प्रतिनिधी).

सकाळच्या सत्रात ब्रम्हाकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय वक्त्या राजयोगिनी डॉ.बी.के सुनिता दीदी यांनी “सुंदर जीवनाचा मार्ग” या विषयावर मार्गदर्शन करताना मनशांतीला अधिक महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. तसेच जीवनात कोणत्याही नकारात्मक बाबींना स्थान न देता सकारात्मक विचारावर अधिक भर द्या असा सल्ला दिला.

रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरलेल्या “*आशाये* ” या ६५ व्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० या परिषदेच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध तज्ञांमार्फत उपस्थितांना मार्गदर्शन झाले.  याप्रसंगी त्या बोलत होत्या.

विविध तज्ञांमार्फत उपस्थितांना मार्गदर्शन

आयडीबीआय बँकेचे चेअरमन पद्मश्री टी. एन. मनोहरन यांनी “सत्यम प्रकरणातील बोध”या विषयी मौलिक मार्गदर्शन केले.

ज्रिबेका मेंडोझा ( अमेरिका) यांनी “माणुसकीचा पाया” या विषयावर बोलताना गरजवंताना ओळखून त्यांच्या मदतीला रोटरी कायम पुढाकार घेते.

भीमा उद्योग समूहाचे पृथ्वीराज महाडिक यांनी भीमा ग्रुपच्या ब्रॅाडबॅंड संकल्पनेची माहिती दिली.ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पोहोचवून शेतीमध्ये आधुनिकता आणणे महत्वाचे असल्याचे सांगितले.

तसेच प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.सुरज पवार यांनी “समाजाला परतफेड“या विषयावर बोलताना कॅन्सर बाबत जनजागृती झाली असल्याचे सांगितले. परंतु उपचार वेळेत घेणे आवश्यक आहे व यात रुग्ण बरा होऊ शकतो. यासाठी मात्र, आशा आणि निश्चय या दोन गोष्टींची गरज असुन सुरवातीलाच प्रतिबंध महत्वाचे आहे , असेही यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच प्रसिद्ध लेखक ग्रीनस्टोन लोबो यांनी “शास्त्रैाक्त ज्योतिषकला” यावर मार्गदर्शन करताना जिवनात त्याचे महत्व अधोरेखित केले.

सायंकाळच्या सत्रात भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर  यांनी “भारतासमोरील सांस्कृतिक आव्हान” या विषयावर संवाद साधताना आपल्या ऐतिहासिक संस्क्रृतीचे महत्व सांगितले.


अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी “मन मे है विश्वास” या विषयातून आपला अत्यंत प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर उलगडला. यावेळी त्यांनी गावाकडचा मुलगा स्वप्न घेऊन मायानगरीत गेला आणि केवळ जिद्दीच्या जोरावर पुढे गेला आहे. कोल्हापूरात शिकलो आणि अनेक गोष्टी शिकलो युपीएसी परीक्षा मुलाखतीत दुभाषीच्या माध्यमातून मुलाखत दिली.आणि पुढे गेलो. या जगात का आला आहेस ? हा शेवटचा प्रश्न मला विचारला गेला होता त्यावेळी मी एका सैनिकाची कविता त्यांना ऐकवली होती.  कितीही अडचणी आल्या तरी मला माझे स्वप्न साकारायचे आहे , असा त्याचा अर्थ होता. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे असे सांगितले. अनेक गरजू लोकांच्या जीवनात सकारात्मकता, जगण्याची उमेद , आशा निर्माण करण्याचे काम रोटरीने केले आहे. पोलिओ मोहीम, साक्षरता, याबरोबरच कोरोना सारख्या संकटात सुद्धा रोटरी मदतीसाठी पुढे आली, हे कौतुकास्पद आहे.असे सांगितले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर रो. नासिर बोरसदवाला, परिषदेचे चेअरमन रो.राजीव परीख, कॉन्फरन्स कौन्सिलर डॉ. रो.वासुदेव देशिंगकर, सचिव रो. विक्रांत कदम ,रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेन्री टॅन (सिंगापूर) , माजी प्रांतपाल व रोटेरियन्स उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!