कोल्हापूरच्या तन्मय कळंत्रेचा “सुवर्ण पंच”..!

अकोला येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम लढतीत उत्तर प्रदेशच्या गुल्फामवर केली मात

कोल्हापूरच्या तन्मय कळंत्रेचा “सुवर्ण पंच”..!

-अकोला येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम लढतीत उत्तर प्रदेशच्या गुल्फामवर केली मात

– 44 ते 48 किलो गटात 36 स्पर्धकांमध्ये तन्मयने अव्वल स्थान पटकावत मिळवले गोल्ड मेडल

– देशाभरातून विविध गटातील सुमारे 400 स्पर्धकांचा उस्फूर्त सहभाग

(“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी : नंदकुमार तेली.)

अकोला येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम लढतीत 44 ते 48 किलो गटात तन्मयने 36 स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थान पटकावत मारला “सुवर्ण” पंच.

– तन्मयची “गोल्डन” कामगिरी

अकोला येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम लढतीत कोल्हापुरच्या तन्मय सचिन कळंत्रेने उत्तर प्रदेशच्या गुल्फामवर मात करून गोल्ड मेडल पटकावले.

– तन्मयचा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रवास असा….

व्हनाळी ता. कागल येथील तन्मयचे प्राथमिक शिक्षण जरग नगर येथील साई इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले.तसेच स्वावलंबी शिक्षण संस्था व जुनिअर कॉलेज येथे त्याचे पुढील शिक्षण सुरू आहे. सध्या तो बारावी आर्ट्स वर्गात शिकत आहे. त्यांने करिअरसाठी शिक्षणाबरोबर खेळाचे महत्त्व ओळखले. त्यानुसार अभ्यासही केला व मैदानावर कसून सरावसह सातत्यही राखले. त्यामुळे सध्या तो अभ्यासासह राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरला आहे.

– 2024 “खेलो इंडिया “साठी निवड

सुवर्णपदक विजेत्या तन्मयची तामिळनाडू येथे होणाऱ्या 2024 “खेलो इंडिया “साठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाचे पंचक्रोशीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तसेच त्याच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

– “क्रीडानगरी कोल्हापूर”च्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा

व्हनाळी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच संपूर्ण गावातून झांज पथक व पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या राष्ट्रीय पातळीवरील विजयामुळे “क्रीडानगरी कोल्हापूर”च्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

– सुवर्णपदक मिळविल्याशिवाय घरी परतणार नाही…

तन्मयने यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोप्य व कांस्यपदक पटकावले होते. मात्र, गोल्ड मेडल मिळवण्यात त्याला यश आले नव्हते. गोल्ड मेडल मिळाल्याशिवाय गावात परतणार नाही. असा संकल्प त्यांने कुटुंबीयांशी बोलून दाखविला होता. तसेच त्यानुसार त्यांने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळी ३ तास व संध्याकाळी ४ तास असा दिवसभरात ७ ते ८ तासांचा तज्ञ प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन कसून सराव केला. तसेच त्याने शिक्षणाबरोबर सरावातही सातत्य राखले. जिद्दीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे. त्याने आपला संकल्प पूर्ण करून राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीमुळे गावाचे नाव क्रीडा क्षेत्रात देशपातळीवर पोहोचवले आहे.

– प्रशिक्षकाचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन

तन्मयला मैदानावर प्रशिक्षकांचे शैक्षणिक व खेळासाठी मार्गदर्शन तर कुटुंबीयांचे वेळोवेळी मोलाची साथ व प्रोत्साहन मिळाले. यामध्ये आजी नंदाताई,आजोबा शंकरराव, आई वैशाली, वडील सचिन, काका जितेंद्र व राजेंद्र,व काकी अश्विनी व प्रियांका, भाऊ यश कळंत्रे कुटुंबीय तसेच मामा महेश व ओमकार कौंदाडे परिवार आदींचा समावेश आहे. तसेच त्याला मित्रपरिवार यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन प्रोत्साहन व सहकार्य मिळाले.

– तन्मयचा बॉक्सिंगचा प्रवास असा….

यापूर्वी तन्मयने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शालेय बॉक्सिंग स्पर्धेत एकूण सुमारे ११ रोप्य व सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या कामगिरी व खेळातील अनुभवाच्या जोरावरच त्याने अकोला येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले.

– तन्मयचे लक्ष.. खेलो इंडिया… “ऑलम्पिक”..!

नुकत्याच अकोला येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्यामुळे त्याची तामिळनाडू येथे होणाऱ्या “खेलो इंडिया” स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असून खेलो इंडिया स्पर्धेतील यशाबरोबरच ऑलम्पिक स्पर्धा खेळण्याचे लक्ष त्यांने ठेवले आहे. त्यानुसार संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांने सरावात सातत्य ठेवून कसून सराव सुरू ठेवला आहे. यासाठी त्याला क्रीडाशिक्षक प्रशांत मोटे यांचे तर सध्या क्रीडा प्रबोधिनीचे आदित्य मने, गजानन कबीर, योगेश निषाद व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट्ट यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे.

You may also like

error: Content is protected !!