राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा क्रीडा सेलच्या उपाध्यक्षपदी सुनील थोरवत
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज : विशेष प्रतिनिधी).
राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा क्रीडा सेलच्या उपाध्यक्षपदी सुनील शामराव थोरवत यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष माजी महापौर आर के पोवार यांच्या हस्ते देण्यात आले.
या पदाचा उपयोग आपण सामाजिक कार्यातून पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाल व पक्ष वाढवाल अशी जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील, पदाधिकारी सुनील देसाई यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीबद्दल नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.