फोटो ओळ :-
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहारसेवक, रुग्णसेवक, पदाधिकारी व वरिष्ठ शिष्ठमंडळ यांची संयुक्त आढावा बैठक ताराबाई पार्क येथील श्रीहरी बालकृष्ण हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, प्रहारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षविस्ताराचा एकमताने निर्धार
– प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न
कोल्हापूर : ( “मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी : नंदकुमार तेली.)
महाराष्ट्राचे लोकनायक, माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. सामाजिक कार्य, रुग्णसेवा, दिव्यांग सेवा या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्ष कार्यरत आहे. सामाजिक सेवेची अखंड गंगा कोल्हापूर जिल्ह्यात घरोघरी पोचवण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक कोल्हापूर येथे आयोजित आढावा बैठक उत्साहात पार पडली. यात एकमताने पक्षविस्ताराचा निर्धार करण्यात आला.
– नवीन पदनियुक्ती व उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव
जिल्ह्यातील प्रहारसेवक, रुग्णसेवक, पदाधिकारी व वरिष्ठ शिष्ठमंडळ यांची संयुक्त बैठक ताराबाई पार्क येथील श्रीहरी बालकृष्ण हॉल याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये स्थानिक पक्षविस्तार, नवीन पदनियुक्ती व उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या पदाधिकाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. या बैठकीत वरिष्ठांच्या काही महत्वाच्या सूचना, सदस्यांची समितीत नावे देणे, जिल्हा नियोजन समितीच्या वतीने काम देणे आदी महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
– सत्कार व निवडपत्र
प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रुपाली जाधव,अनिस मुजावर, शितल कुरले, स्नेहल कारेकर, विकास गायकवाड, दगडु माने, लताताई डवरी, अमर शेणेकर आदींचा विशेष सत्कार करून गौरवण्यात आले. अशिष शिंदे, समाधान हेगडकर यांनी बैठकीचे योग्य नियोजन केल्याबद्दल पक्षाच्या वतिने शाल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.प्रियदर्शनी चोरगे, शितल कुरले, राधा खरे, सन्मती टोपन्नावर यांना निवडपत्र देण्यात आले.
– जयराज कोळी यांचा विशेष सत्कार
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी प्रहार जनशक्ती पक्षात चार वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. याबद्दल त्यांचे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना त्यांच्या माध्यमातून झालेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम, योजना आदींचा आढावा घेतला. दगडू माने यांनी प्रहार घरोघरी पोहोचन्यासाठी अजून जोमाने कार्य करावे असे आवाहन केले. अनिस मुजावर यांनी प्रहारच्या माध्यमातून समाजातील वैचारिक युवकांना एकत्रित आणून, सर्वसामान्य कुटूंबातील महिला व जेष्ठ नागरिकांचे संघटन बनवून त्यांना अधिक सक्षम बनण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सदर बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, प्रहारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.