कारागृहाला “सुधारगृह” शब्द समर्पक

- विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे यांचे प्रतिपादन

कारागृहाला “सुधारगृह” शब्द समर्पक

– विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे यांचे प्रतिपादन

– शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांची कळंबा कारागृहास भेट

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कारागृहाला खरं तर “सुधारगृह” हा शब्द समर्पक मानला जातो. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत मध्यवर्ती कळंबा कारागृहास भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

– कळंबा कारागृहामधील शिस्त व उपक्रमाची स्तुती

प्रास्ताविकाच्या भाषणात डॉ. विवेक धूपदाळे म्हणाले, माणूस हा जन्मताच गुन्हेगार नसतो. परिस्थिती, मानसिक स्थैर्य आदी घटकांचा एकत्रित परिणाम व घडलेल्या गुन्हा याबाबत सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. कायद्याचे शिक्षण घेताना कायदा हा जास्तीत- जास्त समाजोपयोगी कशा प्रकारे अंमलात आणण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सभोवतालचे चौफेर ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगून कळंबा कारागृहामधील शिस्त व उपक्रमाची स्तुती केली.

– अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना कारागृहातील माहितीपर मार्गदर्शन

कारागृह अधीक्षक पांडूरंग भूसारी यांनी कळंबा कारागृहातील सोयी- सुविधा, नियोजन, रुग्णालय, भोजन, बेकरी, लाडू विभाग, ग्रंथालय, रेडिओ स्टेशन, कारखाना, शेती आदी बाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच कारागृहातील बंदी शिक्षा भोगून स्वतःचे पायावर उभे राहण्याची हिंमत निर्माण व्हावी. यासाठी कळंबा कारागृहात विशिष्ट उपाययोजनांची तसेच कारागृहातील कारखाने, हातमाग , सूतार काम, जरीवर्क, शेती उच्च शिक्षण व इतर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आदींबाबत विद्यार्थ्यांना तुरुंगाधिकारी ( द्वितीय श्रेणी) प्रकाश लोमटे, पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील, ओंकार वागडोळे यांनी माहिती दिली.

– स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास वाढीसाठी प्रयत्न करावा : विधी विभाग सचिव (जी.एस.) प्रमोद दाभाडे.

कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना गुन्हेगार म्हणून नावावर पडलेले शिक्का पुसणे सोपे काम नाही. कैद्यांनी स्वतःहून तसा प्रयत्न केला. तरी समाज त्यांना सतत चुकीची जाणीव करून देतो. यातूनच कैद्याची मानसिकता बिघडते. जे बंदी मानसिक दृष्ट्या सक्षम असतात. तेच पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करतात. मात्र, अनेक बंदी नकारात्मक मानसिकतेमुळे पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. किंवा व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीला सतत केलेल्या गुन्ह्याची जाणीव करून न देता त्या व्यक्तींला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत विधी विभागाचे सचिव (जी.एस.) प्रमोद दाभाडे यांनी
आभार प्रदर्शनाच्या मनोगतात व्यक्त केले.

दरम्यान, कारागृहातील विधी तसेच कायद्याशी निगडित विविध पद्धती, कारागृहातील नियम, पद्धती या सगळ्यांची विद्यार्थ्यांना जवळून ओळख व्हावी. या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे यांनी केले होते.

फोटो ओळी : – विद्यापीठाच्या विधी विभागातील विद्यार्थ्यांनी
कळंबा कारागृहास भेट दिली. यावेळी विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे, प्रा. माधवी माळगे, तुरुंगाधिकारी ( द्वितीय श्रेणी) प्रकाश लोमटे, पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील, ओंकार वागडोळे, जी.एस. प्रमोद दाभाडे, प्रियंका जाधवर, राम गोपलानी, औदुंबर बनसोडे, प्रियंका गुरव, हेमा जाधव, तेजस्विनी कासे, अरविंद पाटील, गौरव जवळकर, जयदीप कदम, नागेश दरेकर, यश हेगडे पाटील आदी उपस्थित.

 

You may also like

error: Content is protected !!