हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे “भीम – महोत्सव” चे आयोजन
– संयोजन समितीची माहिती माहिती
– 8 ते 12 एप्रिल 2023 या काळात महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी निखिल तेली).
हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाहू नगरीत प्रथमच
“भीम – महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. 8 ते 12 एप्रिल 2023 या काळात विविध कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री (सामाजिक न्याय विभाग) डॉ. रामदास आठवले यांच्या संकल्पनेनुसार हौसाबाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट संयोजन समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
– महोत्सवाची सुरुवात दि.8 एप्रिल 2023 रोजीपासून
महोत्सवाची सुरुवात दि.8 रोजी निर्माण चौक संभाजीनगर येथे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार आहेत. तर प्रमुख व्याख्याते म्हणून आंबेडकरवादी विचारवंत डॉ. शरणकुमार लिंबाळे उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी यांचा भीम गीतांचा व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
दि.9 रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तर ज्येष्ठ विचारवंत अच्युतराव माने व प्रा सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दै. सकाळचे संपादक श्रीराम पवार पुण्यनगरीची संपादक राजकुमार चौगुले चिकोडीचे खासदार अण्णासो जोल्ले, आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मा. मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी सात वाजता कबीर नाईकनवरे यांचे “सलाम संविधान” या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दि. 10 रोजी रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास आठवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर उद्घाटक म्हणून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, ना. सुधीर मुनगंटीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व्याख्याते म्हणून ऍड. इंद्रजीत कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण आदींसह युती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप यांचा छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दि.11 रोजी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर उद्घाटक म्हणून खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे व अरिहंत समूहाचे उत्तम पाटील तर यावेळी आमदार अमल महाडिक, संजयबाबा घाटगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. व्याख्याते म्हणून संजय आवटे असणार आहेत. सायंकाळी सात वाजता “भीम स्पंदन” या गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
दि.12 रोजी रिपाई राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. तर उद्घाटन म्हणून भागीरथी महिला संस्थेच्या संस्थापिका अरुंधती महाडिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिलावर्ग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच व्याख्याता म्हणून विधीतज्ञ ॲड वैशाली डोळस यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सात वाजता शितल साठे यांचा “नवयान महा जलसा” या प्रमुख शिव- फुले -शाहू- आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, महोत्सवाअंतर्गत दि. 8 ते 12 एप्रिल 2023 या काळात होणारे कार्यक्रम असे : व्याख्यान, गीत- कला अविष्कार, प्रबोधनात्मक कार्यक्रम व भारतीय संसद भवनची 150 फूट उंच प्रतिकृती आदींचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांवेळी रिपाईचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चारिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला अध्यक्ष सतीश कांबळे, सतीश माळगे, प्रदीप ढाले, विजय गोंदणे, रणजीत कांबळे, खंडू कुरणे, प्रकाश कांबळे आधी उपस्थित होते.