“मुटकोर्ट”मुळे सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत

-डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे प्रतिपादन

फोटो ओळी : (कोल्हापुर) शिवाजी विद्यापीठ विधी विभाग च्या वतीने आयोजित मूठ कोर्ट कार्यक्रमात बोलताना डॉ. श्रीकृष्ण महाजन. डावीकडून प्राचार्य आर नारायण जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुनील कोतवाल, विधी विभाग प्रमुख डाँ. विवेक धूपदाळे राजेंद्र पाटील आदी उपस्थित.

“मुटकोर्ट”मुळे सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत

-डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे प्रतिपादन

– शिवाजी विद्यापीठात मुट कोर्ट स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून कोर्टात युक्तिवाद कसा करावा प्रत्यक्ष अनुभव “मूट कोर्ट”द्वारे विद्यार्थ्यांना मिळतो. यामुळे सक्षम विद्यार्थी तयार होण्यास मोलाची मदत मिळते., असे प्रतिपादन डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. शिवाजी विद्यापीठच्या विधी विभागाच्या वतीने मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते.


यावेळी डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, कायद्याची पदवी घेतल्यानंतर लवकरात लवकर सक्षम होण्यासाठी मूटकोर्ट स्पर्धा उपक्रमात सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विद्यापीठ विधी विभाग प्रमुख डाँ. विवेक धूपदाळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाअंतर्गत कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोर्टात कसा युक्तिवाद करावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे महत्त्वाचे असते. यासाठी विधी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुनील कोतवाल म्हणाले, विधी पदवीधर व युवा वकिलांनी आयुष्यात यशस्वी वकील व्हायचे असल्यास केवळ कायद्याचे ज्ञान घेऊन उपयोग नाही. त्यांनी सभोवतालच्या घडामोडींकडे लक्ष ठेवून चौफेर द्मान बाळगणे गरजेच आहे.

निवृत्त न्यायाधीश एस पी कुलकर्णी यांनी दुसऱ्या सत्रात वकिलांची कर्तव्य न्यायालयीन अधिकार विधी शिक्षणानंतरच्या संधी न्यायाधीश परीक्षेसाठी कशाप्रकारे अभ्यास करावा याची सविस्तर माहिती सांगितली.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष विवेक घाटगे यांनी स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून यशस्वी होण्यासाठी कार्य आणि जबाबदारी याची सविस्तर माहिती सांगितली.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुनील कोतवाल यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष गिरीश खडके, शहाजी लॉ कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर नारायण, सूर्यकांत मिरजे, प्राध्यापक राजशेखर मलूष्टे, राजेंद्र पाटील यांच्यासह विधी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध महाविद्यालयांचा समावेश होता.

दरम्यान, या स्पर्धेत एल एल एम प्रथम वर्षातील जी. आर. कारे लॉ महाविद्यालय गोवा, बेस्ट मुटर हर्शल देसाई, llm एल एल एम द्वितिय वर्षातील लॉ विभाग शिवाजी विद्यापीठाचा नंबर आला. बेस्ट मुटर राम गोपलानी, मध्यस्थी रोल प्ले मध्य एल एल एम द्वितीय वर्ष शिवाजी विद्यापीठ विधी विभागाचा क्रमांक आला. विजेत्यांना निवृत्त न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणी गोवाचे अध्यक्ष विवेक घाटगे, निवृत्त प्राचार्य आर नारायण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन माधवी माळगे, प्रमोद दाभाडे यानी केले. सूत्र संचालन मानसी क्षीर सागर यानी केले. आभार विद्यापीठ विधी विभागाचे प्रमुख डॉ विवेक धुपदाळे यानी मानले. कार्यक्रमास चंद्रकांत कुरणे ऋता निंबाळकर हेमा जाधव तेजस्विनी कासे औदुंबर बनसोडे देवदास चौगुले अरविंद पाटील प्रियांका गुरव राम गोपलाने नागेश दरेकर आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!