“राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार”ने “शाहीर दीप्ती”चा गौरव

“राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार”ने “शाहीर दीप्ती”चा गौरव

– महाराष्ट्र राज्यभर “स्त्री शक्तीचा जागर” महिला सक्षमीकरण उल्लेखनीय कामगिरीची दखल

– ताराबाई पार्क येथील डॉ. एम विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

– विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 9 व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

शालेय जीवनापासूनच पोवाड्यांच्या सादरीकरणातून महिला सक्षमीकरण जनजागृती करणाऱ्या “शाहीर दीप्ती सावंत – जाधव” यांचा “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार”ने गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यभर “स्त्री शक्तीचा जागर” महिला सक्षमीकरण उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.

ताराबाई पार्क येथील डॉ. एम विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जॉइंट कमिशनर जीएसटी सुनिता समजित थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार दीप्ती सावंत – जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद, विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नातेवाईक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– दीप्तीला – लहान बहीण तृप्तीची मोलाची साथ…

दीप्तीने शिवकालीन पोवाडे आणि स्त्री शक्तीचा जागर संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर करण्याचे काम करत आहे. तिला लहान बहीण तृप्ती हिचे पोवाडा सादरीकरणांमध्ये साथ लाभत आहे. आता या माध्यमातून दोघी बहिणीही महाराष्ट्र राज्यभर “स्त्री शक्तीचा जागर” करत आहेत. लहान बहिण तृप्तीने ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. सध्या ती पोवाड्यांच्या सादरीकरणाबरोबर डीएडचे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

– शिवराज्याभिषेकसह विविध उत्सवातही पोवाड्यांचे सादरीकरण

शिवतीर्थ रायगडावरील 6 जूनला होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, पन्हाळगडावरील दीपावली पाडव्यानिमित्त होणारा साद सह्याद्रीची, रात्री इतिहासाची हा कार्यक्रम, श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये त्याचबरोबर 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांवरील पोवाडे सादरीकरण केले आहे.

– महाराष्ट्र राज्यभर “स्त्री शक्तीचा जागर”

सामाजिक चळवळींमध्ये, मराठा आरक्षण मोर्चा, तसेच महिलांना पोवाड्याच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्याचे व स्त्रीशक्तीचा जागर, जनजागृतीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम दीप्ती करत आहे. दीप्तीने विविध गड-किल्ल्यांवर ऐतिहासिक पोवाड्याचे सादरीकरण केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यभर कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव, औरंगाबादसह गोवा ,मुंबई या सर्व ठिकाणी “स्त्री शक्तीचा जागर” केला आहे.

– नवव्या वर्षांपासूनच गिरवले पोवाडा सादरीकरणाचे धडे

शाहीर “दीप्ती” ने शालेय जीवनात वयाच्या नवव्या वर्षांपासूनच वडील शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक व समाज प्रबोधनपर पोवाडा सादरीकरणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिने ही लोककला जोपासत आपले पदवीपर्यंत शिक्षण ही पूर्ण केले. दीप्तीने शिवाजी  पेठेतील न्यू पॉलिटेक्निकमध्ये  डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पर्यंत पूर्ण केले आहे. इंजीनियरिंगचे शिक्षण सुरू असताना तिने 3 वर्षे टू व्हीलर मेकॅनिक म्हणून सुद्धा काम केले आहे. या कामातून लग्नाआधी माहेरी असताना कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होती.

– टू व्हीलर मेकॅनिकल ट्रेनर म्हणून कार्यरत…

“दीप्ती”चा अनिकेत अनिल जाधव यांच्याशी तिचा विवाह झाला. पती अनिकेतही दुचाकी दुरुस्ती मेकॅनिकल व्यवसाय करतात दोघांचाही व्यवसाय एकच आहे. लग्नानंतरही तिने पतीच्या संमतीने दुचाकी दुरुस्ती मेकॅनिकल व्यवसाय सुरु ठेवला आहे. सध्या ती प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेत टू व्हीलर मेकॅनिकल ट्रेनर म्हणून कार्यरत आहे. यातून मिळणाऱ्या वेतनातू दीप्ती सासरीही कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आर्थिक हातभार लावत आहे. दीप्तीच्या या कार्यात तिच्या माहेरसह पती अनिकेत जाधव व सासरच्या सदस्यांचेही मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभत आहे.

– पोवाड्याचे सादरीकरण विविध  टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध…

इलेक्ट्रॉनिक मीडियावरील विविध टीव्ही चॅनलवर दीप्तीच्या ऐतिहासिक व समाज प्रबोधनपर पोवाड्यांचे सादरीकरण प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये एबीपी माझा, आय बी एन लोकमत, झी 24 तास, टीव्ही नाईन महाराष्ट्र, साम टीव्ही आदी न्यूज चैनलचा समावेश आहे.

– विविध पुरस्काराने सन्मानित…

पोवाड्याच्या सादरीकरणांसाठी दीप्तीला आजअखेर रोटरी क्लब यांच्यातर्फे “रोटरी वोकेशनल अवॉर्ड” आणि स्पीड न्यूज लाईव्ह 24 या न्यूज चॅनलतर्फे महिला दिनानिमित्त “रणरागिणी पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

– “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार” 9 जणांना प्रदान…

कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघातर्फे “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार” विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. यंदाचा (2023 सालचा) “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार” 9 जणांना जाहीर झाला होता. यामध्ये शाहीर दीप्ती सावंत-जाधवसह महावितरण अधीक्षक अभियंता अंकुर हरी कावळे, कोल्हापूर महानगरपालिका कार्यकारी अभियंता हर्षजीत दिलीपसिंह घाटगे, ऍड. पृथ्वीराज राजेंद्र राणे, सामान्य प्रशासन अधीक्षक अजय पांडुरंग शिंदे, उपअभियंता धनंजय रामराव भोसले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश सुभाष पाटील, डॉ. अजित लोकरे, मावळा कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष उमेश महादेव पोवार आदी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश होता. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 पुरस्कार प्राप्त व्यक्तींना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जॉइंट कमिशनर जीएसटी सुनिता समजित थोरात यांच्या हस्ते गुरुवार दि.12 जानेवारी 2023 रोजी “राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!