राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा 9 रोजी

राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा 9 रोजी

– गौरा इव्हेंट्सच्या संचालिका गौरी नाईक यांची माहिती

– कोल्हापूरमध्ये प्रथमच राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा

– देशातील विविध राज्यातून सुमारे 35 युवक-यवतींचा सहभाग

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे सोमवार दि. 9 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “सिलोस्टल ब्युटी अँड हिरोईन मॅन ऑफ द ग्रेट भारत (2022 – 23)” – (सिझन 4) हे या सौंदर्य स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे., अशी माहिती गौरा इव्हेंट्सच्या संचालिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना संयोजक गौरी नाईक म्हणाल्या, या स्पर्धा गौरी इव्हेंट्स प्रस्तुत, संजय घोडावत ग्रुप स्पॉन्सर, स्टायलिग पार्टनर वूमस्ते क्यूझीन पार्टनर माणिकचंद आटा व सयाजी हॉटेल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातील अव्वल स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अशा प्रकारची राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा ही कोल्हापूरमध्ये प्रथमच होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या कलानगरीचा वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट, जाहिरात व विविध व्यावसायिक पातळीवर पोहोचवण्याचा “मानस” आहे., अशी माहिती ही यावेळी गौरा इव्हेंटच्या संचालिका गौरी नाईक यांनी दिली. या पत्रकार परिषदेला संजय घोडावत ग्रुपचे विवेक गिरी, गौरा इव्हेंट्सचे संचालक जयंत पाटील आदींसह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

– कोल्हापुरात प्रथमच राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा

यापूर्वी खानदेशमध्ये स्थानिक पातळीवरील, पुण्यामध्ये राज्य पातळीवरील सौंदर्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा या कोल्हापुरात आयोजित करण्यात आली आहे. अशा प्रकारची राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात प्रथमच होत आहे.

– 35 युवक-यवतींचा सहभाग

या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेतील सहभागासाठी सुमारे 500 युवक- युवतींची निवड चाचणी घेण्यात आली. यातून देशातील विविध राज्यातील सुमारे 35 जणांची निवड करण्यात आली. यामध्ये सुमारे 20 मुली व 10 मुलांचा समावेश आहे.

– राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी पंच टीम

स्पर्धेसाठी पंच म्हणून अभिनेता रजनीश दुग्गल, मिलिंद गुणाजी, डॉक्टर श्रद्धा नवांजल व संयोजिका गौरी नाईक काम पाहणार आहेत. तसेच अँकर म्हणून संदीप पाटील तर कोरिओग्राफर म्हणून चैतन्य गोखले काम पाहणार आहेत.

– राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे  यांच्या हस्ते उद्घाटन

या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे उद्घाटन संजय घोडावत ग्रुपचे उद्योगपती संजय घोडावत व डी वाय पी ग्रुपचे संजय डी. पाटील यांच्या हस्ते सयाजी हॉटेल येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी माणिकचंदचे प्रकाश धारीवाल, सरस्वती साडी दुकान (गांधीनगर)चे शंकर दुलानी आदी मान्यवरांसह कलाकारांसह, मराठी चित्रपट सृष्टीतील विविध कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!