“मंडळ” व “फुलेवाडी” ची विजयी सलामी

  • “मंडळ” व “फुलेवाडी” ची विजयी सलामी

– कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला
(2022-23) शानदार सुरुवात(फोटो : संग्रहित फोटो)

– शिवाजी तरुण मंडळाची खंडोबा तालीम मंडळावर 3 विरुद्ध 1 गोलने तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाची संध्यामठ तरुण मंडळावर 4 विरुद्ध 0 गोलने एकतर्फी विजयी सलामी

– फुलेवाडीच्या स्टेन्ली इझीचे हॅटट्रिकसह 4 “गोल”

– दोन खेळाडूंना “रेड” कार्ड

– त्याच उत्साहात व जल्लोषात
नव्या हंगामाचे स्वागत

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला मंगळवारी शानदार सुरुवात झाली. राजर्षी शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळांने खंडोबा तालीम मंडळावर 3 विरुद्ध 1 गोलने तर तत्पूर्वी झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा 4 विरुद्ध 0 गोलने एकतर्फी मात करून विजयी सलामी दिली.

त्याच उत्साहात व जल्लोषात
नव्या हंगामाचे स्वागत

फुटबॉलची शिखर संस्था कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित “के एस ए लीग” फुटबॉल स्पर्धा (2022-23) शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या फुटबॉल हंगामाची अखेर सुरुवात झाली. यामुळे शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकीनांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. सामन्यावेळी फुटबॉल संघाच्या समर्थकांनी जल्लोष करत आप-आपल्या संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. समर्थक व फुटबॉलप्रेमीतून नव्या हंगामाचे स्वागत त्याच उत्साहात व जल्लोषात करण्यात आले. पहिल्याच दिवशी तिकीट विक्रीतून एक लाख 48 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.

“मंडळ” तीन विरुद्ध एक गोलने विजयी

दोन्ही संघांनी सामन्याच्या सुरुवातीपासून सावध केला. मात्र,
३५ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळला फ्री किक मिळाली. या संधीचा फायदा उठवत विक्रम शिंदेने मारलेल्या उत्कृष्ट फ्री किक वर संकेत साळोखेने वेगवान खेळ करून हेडरवर गोल केला. यामुळे
शिवाजी तरुण मंडळांनी पूर्वार्धात एक शून्य गोलचे आघाडी घेतली.

उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबा संघाने आक्रमक चाली रचून मंडळवर गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न बचावफळीने फोल ठरवले. साठाव्या मिनिटाला शिवाजीने यशस्वी चाल रचली. सिद्धार्थ कासार याने टाकलेल्या क्राॅसवर ग्यान कोफी डेमाॅस आर्थर कौसी याने वेगवान फटक्यावर उत्कृष्ट गोलची नोंद केली. या गोलला प्रेक्षकांची कडकडून टाळी मिळाली.

दोन खेळाडूंना “रेड” कार्ड

दोन गोलचे ओझे असूनही खंडोबाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारले. यावेळी मैदानावर खंडोबा आणि शिवाजी संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. दोन खेळाडूंनी मारामारी केल्यावर मुख्य पंचांनी शिवाजी तरुण मंडळाचा “किमरन फर्नांडिस आणि खंडोबाचा दिग्विजय असनेकर” यांना “रेड” कार्ड दाखवून त्यांना मैदाना बाहेर घालवणे. मैदानावर तणाव झाल्याने सुमारे दहा मिनिटे थांबला होता.

खंडोबाकडून गोल.. 1 गोलने आघाडी कमी…

पुन्हा खेळ सुरू झाल्यावर खंडोबाच्या अबू बकर हसन याने उत्कृष्ट गोल करत एक गोलने आघाडी कमी केली.

शिवाजी तरुण मंडळाकडून तिसऱ्या गोलची नोंद

सामन्याच्या ज्यादा वेळेत ८८ व्या मिनिटाला रोहित जाधवने मध्य रेषेच्या पुढे चेंडूवर ताबा मिळवत वेगवान फटक्यांवर गोल करत शिवाजी तरुण मंडळाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली.

————————————–

फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाची संध्यामठ तरुण मंडळावर 4 गोलने एकतर्फी मात

तत्पूर्वी, उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर 4 गोलने एकतर्फी मात केली.

स्टेन्ली इझीचे हॅटट्रिकसह 4
“गोल”

फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाच्या स्टेन्ली इझीने शानदार हॅटट्रिकसह चार गोल केले. त्याने पूर्वार्धात २७ आणि ४२ व्या मिनिटाला तर उत्तरार्धात ७५ आणि ७८ व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

दरम्यान, सामन्याचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, के एस ए चे अध्यक्ष युवराज मालोजीराजे, विफा महिला फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष मधुरिमाराजे, यशराजे, तेज घाटगे, दीपक शेळके, सचिव माणिक मंडलिक राजेंद्र दळवी, नंदू बामणे, विश्वास कांबळे, संभाजी मांगुरे, अमर सासने, नितीन जाधव, मनोज जाधव, भाऊ घोडके आदी उपस्थित होते.

शाहू छत्रपती यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस

शाहू छत्रपती यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त
बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांनी 75 फुगे हवेत सोडून शुभेच्छा दिल्या. शिवाजी आणि खंडोबा संघातील 22 खेळाडूंनी प्रत्येकी एक फुटबॉलला प्रेक्षक गॅलरी दिशेने किक मारून अनोखी भेट दिली.

You may also like

error: Content is protected !!