‘कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी’ गणेश नलवडे यांची निवड
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
पोलीस बॉईज असोसिएशनच्या ‘कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी’ गणेश नलवडे यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस बॉईज असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन (भाऊ) पाटील यांच्या हस्ते गणेश नलवडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
पोलीस बॉईज असोसिएशन मधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा व दखल घेऊन त्यांची ‘कोल्हापूर शहर उपाध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव सुरेंद्र माने, शहराध्यक्ष गणेश जाधव, कोल्हापूर दक्षिण निवड समितीचे अध्यक्ष दीपक कांबळे उर्फ कश्यप आदी पदाधिकारी, सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.