मुलात कोल्हापूरचा अथर्व तर मुलींत इचलकरंजीची जानवी “अजिंक्य”

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नांदकुमार तेली)

12 वर्षाखालील मुले व मुली राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलात कोल्हापूरच्या अथर्व डकरेने तर मुलींत इचलकरंजीच्या
जानवी चौगुलेने “अजिंक्य”पद पटकविले. तसेच दुहेरी फेरीतील अंतिम सामन्यात अथर्व डकरे (कोल्हापूर) व रिशे तावडे (पुणे) यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करून विजेतेपद पटकाविले.

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने ए आय टी ए 12 वर्षाखालील मुले व मुली राष्ट्रीय टेनिस स्पर्धा के.एस.ए.च्या टेनिस कॉम्प्लेक्समध्ये यशस्वीपणे पार पडल्या.

12 वर्षाखालील मुले : –

1) अथर्व डकरे (कोल्हापूर) ने वीर चतुर (पुणे) वर ( 6-2, 6-3) गुणांनी मात करून अजिंक्यपद पटकविले.

12 वर्षाखालील मुली : –

1) जानवी चौगुले (इचलकरंजी) ने ईश्वरी कारेकर (सातारा) वर ( 6-2, 7-6) गुणांनी मात करून विजेतेपद मिळविले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण

विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ कोस्पॉन्सरशिप चितळे डेअरीचे जय शेठ व सौ.हेमल शेठ यांच्या हस्ते व माणिक मंडलिक, जनरल सेक्रेटरी, नंदकुमार बामणे, फायनान्स सेक्रेटरी, कार्यकारणी सदस्य- नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे-पाटील, संजय पोरे, दीपक घोडके, तसेच मेहुल केनिया पंच व प्रकाश पाटील प्रशिक्षक केएसए यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

दुहेरी फेरीतील अंतिम सामन्याचा निकाल : –

12 वर्षाखालील मुले( दुहेरी) : –
अथर्व डकरे (कोल्हापूर) व रिशे तावडे (पुणे) यांनी आरव चलानी (ठाणे) व तनिष पाटील (पुणे) यांच्यावर 7-5, 6-4 गुणांनी विजय मिळवून अजिंक्यपद पटकविले.
दुहेरी सामना दिनांक : – 17 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी पार पडल्यानंतर विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिलीप शेटे माजी स्थायी समिती सभापती, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या हस्ते देण्यात आले.

– 48 खेळाडूंचा सहभाग

ही स्पर्धा गेली सात दिवस सुरू होती. या स्पर्धेमध्ये हैदराबाद, बेंगलोर, सोलापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर येथील एकूण 48 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 32 मुले व 16 मुली यांचा समावेश होता. बी जी चितळे -चितळे डेअरी यांची कोस्पॉन्सरशिप लाभलेली होती.

– स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी यांनी घेतले परिश्रम

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने ए आय टी ए 12 वर्षाखालील मुले व मुली राष्ट्रीय टेनिस स्पर्धा के.एस.ए.च्या टेनिस कॉम्प्लेक्समध्ये यशस्वीपणे पूर्ण झाली. स्पर्धेचे, टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून माणिक मंडलिक व सुपरवायझर म्हणून सेजल केनिया तर स्पर्धेचे नियोजनाचे काम मेहुल केनिया यांनी पाहिले.

You may also like

error: Content is protected !!