– राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धा
– आमदार ऋतुराज पाटील यांचे अध्यक्षतेखाली व आमदार जयश्री जाधव यांचे हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण.
कोल्हापूर : ( मानस न्यूज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
छ. शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल मैदान येथे झालेल्या राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलात “मुंबई उपनगर” तर मुलींत “पुणे” अव्वल कामगिरी करत विजेतेपद पटकविले. आमदार ऋतुराज पाटील यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे आमदार जयश्री जाधव यांचे हस्ते सोमवारी दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
स्पर्धेतील अनुक्रमे विजेते संघ
(मुले) – प्रथम : मुंबई उपनगर, द्वितीय : पुणे, तृतीय : नागपूर, चतुर्थ : मुंबई सिटी., *(मुली) -* प्रथम : पुणे, द्वितीय : नागपूर, तृतीय : मुंबई उपनगर, चतुर्थ : ठाणे.
अंतिम सामान्यांचा सविस्तर निकाल : विजेत्या-उपविजेत्या संघातील खेळाडूंची नावे
1. मुले फायनल : मुंबई उपनगर वी वी पुणे (70-55 )
मुंबई उपनगर विजयी (मुले संघ) : संधू हेर्चेल्ले, हर्ष सोमवंशी, हुस्सेन शैख, नीव मनोन, शौर्य चौधरी, आर्यन गवंडे, शौर्य पांडे, आदित्य केशवानी, रफील कुल्लू, जॉर्डन देशमोंद, विधीत दमानी,विहान भाटिया. संघ प्रशिक्षक :- श्रीनाथ पाटील, संघ व्यवस्थापक:- सोनेश ज़ोरे.
———————————————————–
पुणे उपविजयी (मुले संघ) :अनुप मेहला, धृव सिंग, आरक्ष गायकवाड, कुशाग्र अग्रवाल, आदित्य धरमपू, गीनित सोन्नी, आर्यांन कुलकर्णी, राजवर्धन कुलकर्णी, ईशान लोखंडे, रुग्वेद भोसले, ईशान यादव.संघ प्रशिक्षक :- सुरेश शेलार संघ व्यवस्थापक:- अरुण पवार.
—————————————
2. मुली फायनल : पुणे वी वी नागपूर (35-12)
पुणे विजयी (मुली संघ) : अनुष्का शुक्ला, रेवा कुलकर्णी, अन्वी कुलकर्णी, सिया शहा, सलोनी पाटील, काव्या पेशकर, वाण्या अग्रवाल, शरणया प्रकाश, अन्वी पांडे, केया पवळे, श्रावणी खवळे, नित्या बिश्नोई.संघ प्रशिक्षक :- विक्रांत चौधरी, संघ व्यवस्थापक:- विश्वास बोरटे
—————————————
नागपुर उपविजयी (मुली संघ) : आनंदी सोनवणे, काव्यांजली पल, अक्षरा रोकडे, पलक पंचमुंडे, विधी गतलेवार, आश्लेषा दाभाड़कर, रिधिमा साहू, सृष्टी भगत, आर्या धग्वार, सहि खोपडे, प्रसिद्धी सोनकर, श्रावणी शेलकर.संघ प्रशिक्षक :- रजत पवार, संघ व्यवस्थापक:- गौरव रेड्डी.
—————————————
तत्पूर्वी झालेल्या सेमी फायनल सामान्यांचा सविस्तर निकाल
(मुले) – 1. पुणे वी वी नागपूर (58-59)., 2. मुंबई उपनगर वी वी मुंबई सिटी (53-26). (मुली) – 1. पुणे वी वी मुंबई उपनगर (33-29)., 2. नागपूर वी वी ठाणे (30-9).
——––——————————
यांनी केले स्पर्धेचे संयोजन
जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष नितीन दलवाई आणि हितेश मेहता, सेक्रेटरी प्रा.डॉ शरद बनसोडे, प्रा.डॉ सुरेश फराकटे, डॉ. राजेंद्र रायकर, मानसिंग पाटील, विनायक साळोखे, केदार सुतार,जेसिका अँड्र्यूज, सचिन पांडव, संदीप खोत, वंदना पाटील, अमित दलाल, उदय पाटील, आकाश जाधव, तेजस्विनी महाडिक, नारायण पाटील, परेश नायकवडे, शुभम पाटील, अनिरुद्ध विटेकर, आशुतोष खराडे.
दरम्यान, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष 2022” चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना व डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल प्रायोजित राज्यस्तर सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धा छ. शहाजी लॉ कॉलेज बास्केटबॉल मैदान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी सस्मिता महंती डायरेक्टर प्रीन्सिपल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, आनंद देवधर प्रिंसिपल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन धनंजय वेळूकर, सचिव महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन शत्रुघ्न गोखले, जयंत देशमुख, सी इ ओ मोरया ग्रुप मंगेश पाटील, सी इ ओ अदिती इंडस्ट्रीज राहुल कात्राट, डायरेक्टर भारत डेरी स्पूर्ती प्रॉडक्ट्स प्रकाश मेहता व किरीत मेहता, शिल्पा कपूर प्रिन्सिपल पोदार स्कूल, डॉ गीता पिल्लाय जानकी हॉस्पिटल, कविता घाटगे पर्ल हॉटेल, आर. डी. पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, एस वी सुर्यवंशी जेष्ठ ॲॅथलेटिक कोच आदी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे उपाध्यक्ष नितीन दलवाई आणि हितेश मेहता, सेक्रेटरी प्रा.डॉ शरद बनसोडे, प्रा डॉ प्रकाश बनसोडे, प्राचार्य डॉ सुरेश फराकटे, डॉ. राजेंद्र रायकर, मानसिंग पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शरद बनसोडे यांनी केले तर आभार नितीन दलवाई यांनी मानले. तर सूत्रसंचलन राजेंद्र बुवा यांनी केले.