श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अजिंक्य
– अटीतटीच्या लढतीत महावीर महाविद्यालयावर मात
– कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 19 वर्ष मुली क्रिकेट स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर : दिनांक 28.11.2024. / (“लोकमानस न्युज 4” – विषेश प्रतिनिधी).
अटीतटीच्या लढतीत श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने महावीर महाविद्यालयावर मात करून स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले. सदर मनपास्तर शासकीय शालेय 19 वर्ष मुली” क्रिकेट स्पर्धा मेरी वेदर मैदानावर उत्साहात पार पडल्या.
श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची महाविर महाविद्यालयावर अटीतटीच्या लढतीत मात
त्यानंतर फायनल सामना श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज महावीर कॉलेज यांच्यामध्ये यांच्यामध्ये झाला . यामध्ये *श्री साई हायस्कूलने टॉस जिंकून कर्णधार समिधा चौगले हिने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला .* यामध्ये श्री साई हायस्कूलने ८ षटकात 63 धावा केल्या यामध्ये अनुक्रमे कु. *समिधा चौगले हिच्या 26 धावा* व *पूर्वा चौगले हिने 20 धावा व श्रेया पांचाळ हिने 10* धावा करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
उत्तरादाखल खेळताना महावीर कॉलेजच्या संघाने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाताना ५८ धावाच केल्या. *अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून 20 धावा व दोन विकेट घेणाऱ्या पूर्वा चौगले हिला गौरवण्यात* आले.
उत्कृष्ट खेळाडू..
यामध्ये *मालिकावीर म्हणून समिधा चौगले हिला घोषित करण्यात आले. तिने तीन सामन्यात47 धावा व 6 विकेट घेतल्या.* *श्रेया पांचाळ, साक्षी डांगे, सोनल यांनी उत्कृष्ठ गोलंदाजी केली* .
विजयी साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघ व प्रशिक्षक
समिधा चौगले (कर्णधार), पूर्वा चौगले (उपकर्णधार), श्रेया पांचाळ, वैष्णवी धनगर, ईश्वरी अवसरे, साक्षी डांगे, सोनल माने , पयोष्णी दोशी, प्राजंल चौगले ,सोनाक्षी खाडे, पायल माने ,ऋतुजा कांबळे, प्रज्ञा पाटील, साक्षी बिराजदार, आरोही कळके , दुर्गेश्वरी सोनुले , क्रीडा शिक्षक सरदार पाटील, वर्षाराणी पाटील, विनायक पवार.
तत्पूर्वी झालेले सामने….
तत्पूर्वी, श्री साई हायस्कूल व कनिषठ महाविद्यालयाने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज वरती एकतर्फी विजय प्राप्त केला.
यामध्ये कर्णधार समिधा चौगले हिने 2 षटकात 1 धाव देऊन 5 विकेट घेतल्या. यानंतर पहिला सेमी फायनल सामना महावीर महाविद्यालय व विवेकानंद कॉलेज यांच्यामध्ये झाला
त्यानंतर सेमी फायनल सामना श्री साई हायस्कूल विरुद्ध कमला कॉलेज कोल्हापूर यांच्यामध्ये झाला. यात कमला कॉलेजनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत42 धावा केल्या. यास प्रत्युतर देताना कर्णधार समिधा चौगले हिच्या नाबाद 21 धावा, व पूर्वा चौगले हिच्या नाबाद 19ं धावाच्या जीवावर हा सामना पाचव्या षटकात श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने जिंकला.
कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 19 वर्ष मुली” क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या…
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित आणि कोल्हापूर क्रिकेट अंपायर असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्याने मेरी वेदर मैदानावर “कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय 19 वर्ष मुली” क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांचे अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे मार्गदर्शनानुसार मनपास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शिवाजी कमते, सरदार पाटील यांनी केले.