संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार..!
– युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचे सूचक विधान
– सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन शहरातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून आणला सुमारे 25 कोटींचा निधी
– रस्ते विकास, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, उद्यान, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदींच्या 50 प्रभागातील विविध विकास कामांचा समावेश
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज – 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन शहरातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून आणला सुमारे 25 कोटींचा निधी आणला आहे . या निधीतून रस्ते विकास, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, उद्यान, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायामशाळा, जलतरण तलाव आदींच्या 50 प्रभागातील विविध विकास कामांची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे., अशी माहिती युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पत्रकारांनी आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संधी मिळाल्यास विधानसभा लढविणार असल्याचे सूचक विधानही यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक म्हणाले, राज्य शासनाकडून आलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील उत्तर व दक्षिण भागातील सुमारे 50 प्रभागांमध्ये विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, विरुंगुळा केंद्र, उद्यान, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायामशाळा आदी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. तसेच राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. असे सांगितले.
या 50 प्रभागातील पायाभूत सुविधांचा होणार विकास…
राज्य शासनाकडून आलेल्या 25 कोटी निधीतून शहरातील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 50 प्रभागातील पायाभूत सुविधांचा विकास साधला जाणार आहे. या प्रभागांमध्ये (उत्तर) – कसबा बावडा, लक्ष्मी विलास पॅलेस, पोलीस लाईन, सर्किट हाऊस, भोसलेवाडी, कदमवाडी, नागळा पार्क, रमण मळा, कनाननगर, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, साईक्स एक्सटेन्शन, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी उद्यमनगर, यादवनगर, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, टाकळा खण, राजारामपुरी एक्सटेन्शन, कैलास गडची स्वारी मंदिर, सिद्धाळा गार्डन, फिरंगाई तालीम, रंकाळा स्टॅन्ड, पंचगंगा तालीम, दुधाळी पॅव्हेलियन, बुद्धगार्डन. (दक्षिण) – टेंबलाईवाडी, विक्रमनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर बस स्थानक, संभाजीनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय, राजेंद्रनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, रामानंदनगर, तपोवन, राजलक्ष्मीनगर, फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी, सुर्वेनगर, कणेरकरनगर क्रांतीसिंह नाना पाटीलनगर आदींचा समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक, नगरसेविका, महाडीक समर्थक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.