रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे “11 वे यशस्वी यामिनी प्रदर्शन” 20 सप्टेंबरपासून
– यामिनी इव्हेंट चेअरमन रो. आरती पवार यांची माहिती
– प्रदर्शन दि. 21 ते 22 सप्टेंबर 2024 या काळात सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहणार
– प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल्स
कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज -4 ” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे “11 वे यशस्वी यामिनी प्रदर्शन” 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे प्रदर्शन सयाजी हॉटेल च्या व्हिक्टोरिया हॉल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन दि. 21 ते 22 सप्टेंबर 2024 या काळात सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहणार आहे. अशी माहिती यामिनी इव्हेंट चेअरमन रो. आरती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना यामिनी इव्हेंट चेअरमन रो. आरती पवार म्हणाल्या, या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थित दुपारी 4 वाजता होणार आहे. रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे वर्षभर गरजूंना मदत, विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट व स्वयं शाळांतील वस्तू आपल्याला प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
पुढे बोलताना रो. आरती पवार यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणारा निधी विविध सामाजिक उपक्रम महिला सबलीकरण गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. तसेच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो., या हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वॅक्सिन आदी विविध विधायक उपक्रमांसाठी वापरला जातो., असे सांगितले.
– प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत 100 हून अधिक स्टॉल्स….
हा रोटरी क्लब ऑफ गार्गीचा सिग्नेचर इव्हेंट शॉपिंग फेस्टिवल आहे. या प्रदर्शनात विविध 100 स्टॉल्स मांडण्यात येणार असून याचे संपूर्ण बुकिंग झाले आहे. या प्रदर्शनामध्ये कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी याचबरोबर दिल्ली, बनारस, गोवा, मुंबई, पुणे, बेळगाव आणि इतर देशातील विविध शहरातून स्टॉलधारक येणार असून आपले स्टॉल उभारणार आहेत. या स्टॉल्सवर ड्रेसेस, साड्या, लहान मुलांची कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट, याचबरोबर रिअल ज्वेलरी, डायरेक्ट विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या खरेदी करता येणार आहे.
या पत्रकार परिषदेला क्लबच्या अध्यक्षा योगिनी कुलकर्णी, सेक्रेटरी लक्ष्मी शिरगावकर, रोटरी सदस्य रो साधना घाटगे, कल्पना घाटगे, शोभा तावडे, याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो रेणुका सप्रे, रो दीपिका कुंभोजकर, रो प्रीती मर्दा, रो प्रीती मंत्री, रो गिरिजा कुलकर्णी, रो मेघना शेळके आदींसह रोटरी क्लब ऑफ गार्गीज व यामिनीच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.