“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात “आगमन गणरायाचे”

- शहरासह उपनगरातील सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचे जल्लोषात मिरवणुका, स्वागत व प्रतिष्ठापना  - लेसरशो, लाईट ईफेक्ट, एलईडी, साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात, गाण्याच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई

“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात “आगमन गणरायाचे”

– शहरासह उपनगरातील सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचे जल्लोषात मिरवणुका, स्वागत व प्रतिष्ठापना 

– लेसरशो, लाईट ईफेक्ट, एलईडी, साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात, गाण्याच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” :  विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोकण-महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण “गणेश चतुर्थी”.  शनिवारी (दि.7) घरगुती व सार्वजनिक तरुण मंडळांच्या गणेश मूर्तींचे जल्लोषात व भक्तीपूर्ण वातावरणात आगमन झाले.  राजारामपुरी परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या जल्लोषात  निघालेल्या मिरवणुका पाहण्यासाठी शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रमुख मिरवणूक मार्गावर मोठी गर्दी केली होती.

घरगुती गणेशमूर्तींंची प्रतिष्ठापना सकाळपासून दुपारपर्यंत करण्यात आली. दिवसभर व रात्रीही पावसाची उघडझाप सुरू राहिली.

दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन निवडणुकीला सुरुवात झाली. गणेशमूर्ती मंडळाजवळ आल्यानंतर मंडळात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शहर, उपनगरासह  राजारामपुरी परिसरातील  आगमन मिरवणुका सुरू राहिल्या . या मिरवणुका पाहण्यासाठी उशिरापर्यंत प्रमुख मार्गावर नागरिकांची गर्दी केली होती. मिरवणुका पाहण्यासाठी महिलावर्गाचीही उपस्थिती लक्षणीय होती.

जिल्हा पोलीस प्रशासनाने चौख बंदोबस्त ठेवल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळाली.  तसेच मिरवणूक मार्गावरून आगमन मिरवणुका सुरळीत पार पडल्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता आगमन मिरवणुका सुरळीत पार पडल्या. पोलिसांच्या या अविरत कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात आगमन गणरायाचे…

पारंपारिक वाद्यांच्या गजरात भक्तीपूर्ण वातावरणात “घरगुती गणेशाचे” आगमन व प्रतिष्ठापना …

शहरासह उपनगरातील सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचे जल्लोषात मिरवणुका, स्वागत व प्रतिष्ठापना ….

लेसरशो, लाईट ईफेक्ट, एलईडी, साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात, गाण्याच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई….

गणेश आगमनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी राजारामपुरी परिसरात अबालविरुद्ध नागरिकांची मोठी गर्दी ….

You may also like

error: Content is protected !!