राज्यात “लव्ह जिहाद विरोधी कायदा” तत्काळ लागू करा
– हिंदू जनजागृती समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व जिल्हा पोलिस प्रशासन यांना निवेदन
– उरण येथील यशश्री शिंदे खूनच्या घटनेचा निषेध, निदर्शने
– समितीच्या महिला वर्ग पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांनी घटनेविरोधातील घोषनांनी परिसर दणाणून सोडला
कोल्हापूर : (“लोकमानस न्युज 4” : विषेश प्रतिनिधी).
राज्यात “लव्ह जिहाद विरोधी कायदा तत्काळ” लागू करा” या मागणीसह इतर 9 मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे शुक्रवारी (दि.2) आंदोलन करण्यात आले. तसेच यशश्री शिंदे खूनाच्या घटनेचा निदर्शने करुन विरोधातील घोषणांनी तीव्र निषेध करण्यात आला.
नराधमाला भरचौकात फाशी द्या
कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना समितीच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीच्या महिला वर्ग पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांनी राज्यात “लव्ह जिहाद विरोधी कायदा तत्काळ” लागू करा”.. नराधमाला भरचौकात फाशी द्या… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या निवेदनात, वरील प्रमुख मागण्यांसह इतर 9 मागण्या करण्यात आल्या आहेत.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायदे करण्याची गरज
राज्यासह देशांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर नियंत्रण, गुन्हेगारांवर वचक बसावा, या दृष्टीने उपयोजनांची गरज आहे. तसेच याचे गांभीर्य, भावी पीढीच्या सुरक्षेचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न लक्षात घेऊन सरकारने महिला सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायदे करण्याची गरज आहे. अशा घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह प्रबोधनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात यावे. यासाठी समितीचे नेहमीच सहकार्य राहिल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी शिवसेना हातकणंगले तालुकाध्यक्ष वनिता पाटील, जैन पदवीधर संघटना धर्मरक्षा अध्यक्षा सुप्रिया पाटील, धर्मप्रेमी मनिषा जगताप, प्रमोद जगताप, रणरागिणी शाखेच्या प्रीती पवार, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, हिंदू प्रेमी सुनिल थोरवत उपस्थित होते.