*राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
– *शाहू प्रेमींनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन*
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व व कोल्हापूरकरांचा मानबिंदू असलेले आदर्श राजे, पुरोगामी विचारांचे महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक 26 जून 2024 रोजी होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. या जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 15 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बेठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील शाहू अभ्यासक व शाहू प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
या उत्सवात वृक्षारोपण, व्याख्याने, शोभायात्रा नियोजन, परिसंवाद, दिंडी, पदयात्रा, तसेच राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या विविध वास्तू, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे यांचे जतन, संवर्धन व जनतेपर्यंत महाराजांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
0000000
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे
हातकणंगले येथे आयोजन
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगलेमार्फत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता संजय घोडावत इन्स्टीट्युट हॉल, सी-बिल्डिंग, अतिग्रे, ता. हातकणंगले येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून तर आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे व संजय घोडावत इन्स्टीट्युटचे प्राचार्य विराट गिरी यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
व्यक्तीमत्व विकास व 10 वी, 12 वी नंतरच्या करियर संधी व स्वयंरोजगाराकरिता लघुउद्योग उभारणी मार्गदर्शन शिबीरात डॉ. जॉर्ज क्रूज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व कुलभुषण उपाध्ये (बँक ऑफ इंडिया स्टार ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था,कोल्हापूर) मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हातकणंगले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नार्वेकर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रभारी सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सन 2018-19, 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खासबाग मैदान जवळ, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कार्यालयीन वेळेत मिळेल. यासाठी दि. 1 जुलै 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यानुसार वयाची अट पाहून कोल्हापूर जिल्ह्यातील युवक, युवतींनी आपला प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.
जिल्हा युवा पुरस्कार स्वरुप – जिल्हा स्तरावर एक युवक तसेच एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. प्रति युवक व युवतीसाठी हा पुरस्कार गौरवपत्र सन्मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार. प्रति संस्थेमाठी गौरवपत्र सन्मान चिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार अशा स्वरुपाचा असेल.
पात्रतेचे निकष (युवक व युवतींसाठी )- अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य तर राज्यस्तर पुरास्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठी पात्रता निकष- पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फूर्तीन केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार, संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन- युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य दि.1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षांची कलेली कार्य, कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याची साधन, संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेम प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य केलेले असावे.
***
कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
शासकीय आयटीआय कळंबा येथे प्रवेश सत्र 2024 साठी एकूण 31 व्यवसायांकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर झाले असून ऑनलाईन प्रवेश अर्ज 30 जून 2024 पर्यंत सादर करण्याबाबत कार्यवाही सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर माहिती बरोबर असल्याची खात्री करुन त्यानंतर प्रवेशअर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
प्रवेश शुल्क मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये व खुल्या गटातील उमेदवारांना 150 रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व त्यानंतर या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी एकूण सहा प्रवेश फे-या होतील. शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा सर्व उमेदवारांनी लाभ घेवून प्रवेशासाठी व्यवसाय विकल्प सादर करावा.
संस्थेत एकूण 31 व्यवसाय आहेत. एक वर्ष मुदतीचे एकूण 15 व्यवसाय असून दोन वर्ष मुदतीचे एकूण 16 व्यवसाय आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 1 हजार 340 जागा भरल्या जातील. प्रवेशासाठी महिलांना, मुलींना सर्व व्यवसायांत 30 टक्के आरक्षण असून मुलींसाठी बेसिक कॉस्मोटोलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी, फळभाज्या टिकवणे इ. स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मुळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. संस्थेत 450 प्रशिक्षणार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध असून, शासकीय नियमाप्रमाणे एसटी, बस पास, रेल्वे पास सवलत तसेच विद्यावेतन दिले जाते.
जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवलेल्या असल्यामुळे या प्रवेश सत्रामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांना प्रवेशासाठी जास्तीच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेमध्ये एक वर्ष मुदतीचे व दोन वर्ष मुदतीचे खालील व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.-
एक वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम- बेसिक कॉस्मॉलॉजी, सुतारकाम, कॉम्प्युटर ॲप अॅण्ड प्रोग्रॅमिंग असि., फौंड्रीमन,
फ्रुट व्हेजीटेबल अॅण्ड प्रोसेंसिग, मेसन (बिल्डींग कन्स्ट्रक्शन), यां. डिझेल, या. कृर्षित्र, प्लॅस्टीक प्रोसे. ऑपरेटर,
नळ कारागीर, सुईंग टेक्नॉलॉजी, पत्रेकारागिर, स्टेनोग्राफी इं., सरफेस ऑर्नामेंटस व संधाता इ.
दोन वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम- आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, आयसीटीएसएम, यंत्रकारागिर, यंत्रकारागिर घर्षक, यां.कृषी व यंत्रसामुग्री, मेक मशिन टूल मेन्टनन्स, यांत्रिक मोटारगाडी, यां. प्रशितन व वातानुलीकरण, रंगारी जनरल, टूल ॲण्ड डाय मेकर, कातारी, तारतंत्री व विजविलेपक इ.
प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक ITIAdmission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी. वेळापत्रकात काही बदल झाल्यास नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल.
***
स्पर्धा परिक्षार्थींनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा
: सहायक आयुक्त संजय माळी
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका” ही योजना राबविली जाते. या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अभ्यासिकेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ,कोल्हापूर, दूरध्वनी 0231-2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. इच्छुक, गरजू पदवीधर उमेदवारांनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
***
गारगोटी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
गारगोटी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत मागास व आर्थिकदृष्टया मागास मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2024-25 मध्ये इ. 8 वी प्रासून ते उच्चशिक्षणापर्यत प्रवेश दिला जात असून वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुर्लीचे शासकीय वसतिगृह, के. डी. देसाई कॉलनी, गारगोटी, ता. भुदरगड जि. कोल्हापूर या वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
वसतिगृहात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच दरमहा 600 रुपये निर्वाहभत्ता, गणवेशभत्ता, स्टेशनरी भत्ता, सहल भत्ता दिला जातो.
***
***
नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी
28 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) :
नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२५ देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. जाहिरात , परीक्षेचा अभ्यासक्रम , ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in तसेच https://pitckolhapur.org/preias/CET.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज 28 जून 2024 रोजी रात्री १२ पर्यंत भरावा. प्रवेश परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेण्यात येणार आहे. या संधीचा इच्छुक पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आव्हान या केंद्राचे संचालक डॉ. लता देवाप्पा जाधव यांनी केले आहे.
राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर यांच्यासह यशदा संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र (ACEC),पुणे, PCMC संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी, पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचलित यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ व ठाणे महानगरपालिका संचलित चिंतामणराव देशमुख यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र (CDIAC) ठाणे यांच्यामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षासाठी पूर्णवेळ विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते.
000000