कोल्हापूरच्या स्केटर्सचा मुंबईत सन्मान…
– चंदीगड व चेन्नई येथील ६१ व्या.राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्केटर्सचा मुंबईत सोहळ्याचे आयोजन
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालय केंद्र सरकार यांच्या मान्यतेच्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व यांच्यावतीने चेन्नई व चंदिगड येथे घेण्यात आलेल्या ६१.व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या व सहभागी स्केटिंग खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. रविवार दि. २५ रोजी स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या वतीने कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अध्यक्ष पि.के. सिंग प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य संघटना उपाध्यक्ष डॉ. महेश कदम, राज्य संघटना सचिव .राजेंद्र जोशी, .खजानिस डी.एस .बुलंगे ., उपसचिव सुनील शिरसाठ,. गणेश राव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील जिल्हा संघटनेच्या स्केटिंग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
सन्मानित केलेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे…
१) आवनीअनुप जाधव ९ते ११(वयोगट दोन सुवर्णपदक), २)ओम मेघशाम जगताप (स्पेशल खेळाडू एक कास्य), ३) ॲडवोकेट धनश्री रामचंद्र कदम. (रोलर डरबी सुवर्णपदक), ४) कु. तेजस्विनी रामचंद्र कदम. (रोलर डरबी सुवर्णपदक) यांचा तर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले १) सुजल सुधीर पाटील, २) यश भिकू कांबळे. आणि स्पीड विभाग रिवान पृथ्वीराज शेळके. यांना मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापुरात खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा….
नुकतेच या ठिकाणी कोल्हापुरात जिल्हा संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या सर्वांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम ॲड. धनंजय पठाडे, आकाराम प्रा.पाटील संभाजी पाटील., संजय फराकटे., अजित मोहिते., जगदीश दळवी. यांचे मार्गदर्शन तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश अभिमन्यू कदम. राष्ट्रीय प्रशिक्षक भास्कर कदम यांचे प्रशिक्षण लाभले.
फोटोवृत्त (न्यूज). –
चंदिगड व चेन्नई येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद व सहभागी झालेले स्केटिंग खेळाडू डावीकडून १) सुजल पाटील. २) अवनी जाधव. ३) तेजस्विनी कदम, ४) रिवान शेळके.५) ॲडवोकेट धनश्री कदम. ६) ओम जगताप.७ )यश कांबळे. मध्यभागी आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश अभिमन्यू कदम मुलांच्या समवेत.