स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे वेदात देसाई सन्मानित

- कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा उत्साहात

स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे वेदांत देसाई सन्मानित

– कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा उत्साहात

कोल्हापूर : ( ” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोंढवा बुद्रुक , पुणे येथील वेदांत विशाल देसाई याने मुलाच्या 7 ते 9 वयोगटात महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत दोन रजत पदक मिळविले होते व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले.  त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष पी के सिंह , टीम इंडिया कोच श्रीपाद शिंदे, पुणे स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष  राजेंद्र जोशी आणि कल्याण पत्रकार संघ अध्यक्ष अविनाश ओंबासे, कोल्हापूरचे महेश कदम यांच्या हस्ते वेदांतला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

– 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा गौरव

वेदात मूळचा कोल्हापूर गावचा व सद्ध्या पुण्यात युरो स्कूल उंड्री मध्ये शिक्षण घेत आहे.  त्याच्या कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला. 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळविणाऱ्या खेळाडू तथा सहभागी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.

लक्ष… देशासाठी “सुवर्ण” पदकाचे….!

वेदात सध्या कोंढवा बुद्रुक स्केटिंग अकॅडमी, पुणे येथे प्रशिक्षक विशाल देसाई व तनुजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे. नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप पदक मिळविण्यासाठी वेदांत गेल्या एक वर्षापासून कठीण मेहनत घेत आहे. वेदात वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी नॅशनल स्केटिंग चॅम्पियन झाला असून येत्या काळात एशियन गेम्स सारख्या स्पर्धा मधून भारत देशासाठी नक्कीच सुवर्ण पदक मिळवेल. अशी आशा त्याच्या पालकांनी व्यक्त केली. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सदर विद्यार्थ्यांला प्रमुख मार्गदर्शन विजय हटकर, संजय शंकर जाधव, जयंत देशपांडे, संजय कांबळे यानी केले.

You may also like

error: Content is protected !!