एटी (अरुण तेली) स्पोर्ट्स अजिंक्य

- अंतिम सामन्यात प्रवीण पाटील सुपरकिंग्ज संघावर अंतिम षटकातील ४ चेंडू व ५ गडी राखून मात : - अंतिम सामन्याचा सामनावीर गजानन गुरव तर मालिकावीर ऋषिकेश माळी ठरला : - कोल्हापुरातील शास्त्रीनगरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर पहिल्या "लिंगायत प्रीमिअर लीग २०२४" स्पर्धा उत्साहात : - स्पर्धेत ८ संघातून सुमारे १५० पेक्षा अधिक लिंगायत खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

एटी (अरुण तेली) स्पोर्ट्स अजिंक्य

– अंतिम सामन्यात प्रवीण पाटील सुपरकिंग्ज संघावर अंतिम षटकातील ४ चेंडू व ५ गडी राखून मात

– अंतिम सामन्याचा सामनावीर गजानन गुरव तर मालिकावीर ऋषिकेश माळी ठरला

– कोल्हापुरातील शास्त्रीनगरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर पहिल्या “लिंगायत प्रीमिअर लीग २०२४” स्पर्धा उत्साहात

– स्पर्धेत ८ संघातून सुमारे १५० पेक्षा अधिक लिंगायत खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

 एटी (अरुण तेली) स्पोर्ट्स संघाने “लिंगायत प्रीमिअर लीग २०२४” स्पर्धेच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात प्रवीण पाटील सुपरकिंग्ज संघावर मात करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. कोल्हापुरातील शास्त्रीनगरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या “लिंगायत प्रीमिअर लीग २०२४” स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

– एटी (अरुण तेली) स्पोर्ट्स संघाचा स्पर्धेचे चषकावर  “कब्जा”

स्पर्धेतील अंतिम सामना अपेक्षेप्रमाणे अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रवीण पाटील सुपरकिंग्ज संघाने ६३ धावात गुंडाळला.  प्रत्युत्तरादाखल खेळताना एटी स्पोर्ट्स संघाने हे लक्ष सहज साध्य केले. संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवत अंतिम षटकातील ४ चेंडू व ५ गडी राखून  स्पर्धेचे विजेतेपद मिळवून चषकावर आपले नाव कोरले.

– स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू असे…

अंतिम सामन्याचा सामनावीर गजानन गुरव तर मालिकावीर ऋषिकेश माळी ठरला. तसेच स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज गजानन गुरव तर उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेश माळी ठरला. या खेळाडूंनी आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत संघाला विजेतेपद मिळवून देत उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने स्वतःसह  संघाचा नावलौकिक मिळवला.

– स्पर्धेत ८ संघातून सुमारे १५० पेक्षा अधिक लिंगायत खेळाडूंचा उस्फुर्त सहभाग

स्पर्धेत ८ संघातून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १५० पेक्षा अधिक लिंगायत खेळाडूंनी सहभाग नोंदविला.  अंतिम स्पर्धेआधी १६ साखळी पद्धतीने (लीग) सामने खेळविण्यात आले.  पहिल्या “लिंगायत प्रीमिअर लीग २०२४” क्रिकेट स्पर्धेतील सर्वच सामने रंगतदार व चुरशीचे झाले. स्पर्धेच्या निमित्ताने लिंगायत समाजातील क्रिकेट खेळाडूंना आपल्या क्रीडा गुणांना सादर करण्याचे एक व्यासपीठ लिंगायत प्रीमियर लीगच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. पहिल्याच स्पर्धेत खेळाडूंनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने स्पर्धा संयोजकांनी यापुढेही खेळाच्या वाढीसाठी या स्पर्धा आणखी चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचा संकल्प केला आहे.

– स्पर्धेत या ८ संघानी सहभाग नोंदविला…

मयूरा ग्रुप (चंद्रशेखर डोलली), शिवशक्ती सुपरजायंट्स (अजय डोईजड), कोल्हापूर नाईट रायडर्स (आकाश वाली), प्रवीण पाटील सुपरकिंग्ज (प्रवीण पाटील), एटी स्पोर्ट्स (अरुण तेली), बीपीएस चॅलेंजर्स (रावसाहेब चिंचणे), त्रिमूर्ती टायटन्स (श्री. शिवप्रसाद तेली), एम अँड के वोरीयर्स (गोरख माळी). या आठ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवले सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवले.

– स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी यांनी घेतले विशेष परिश्रम

संपूर्ण स्पर्धेचे संयोजन मंजुनाथ साव्यानावर यांच्या मार्गदर्शनाखाली   संयोजन समितीचे सदस्य विजय पाटील,  विजयकुमार पाटील,  विनायक वाले,  सागर कुरबेट्टी,  सत्यम मुरदंडे,  मनोज कतगर आदींच्या टीमने केले. स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन संदीप नष्टे, अमरदीप पाटील, तसेच चीफ पेट्रन म्हणून सूर्यकांत बुध्दीहाळकर-पाटील यांनी कामकाज पहिले. या स्पर्धा संयोजन टीम व इव्हेंट टीममधील सर्वांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

– बक्षिस समारंभास यांची होती प्रमुख उपस्थिती

बक्षिस समारंभास उद्योजक अजय डोईजड,  रावसाहेब चिंचणे,  गोरख माळी,  पद्मराज पाटील,  किरण सांगावकर,  सुनील गाताडे,  राजू वाली,  शिवकुमार पाटील, सीए. बाळासाहेब साव्यानावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विजेत्या संघांच्या उत्कृष्ट खेळाचे व सहभागी खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धा संयोजन समितीचे चांगल्या स्पर्धा पार पडल्याबद्दल कौतुक करून प्रोत्साहन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

अशा आहेत स्पर्धेनंतर स्पॉन्सर्स व हितचिंतकांचे अभिप्राय, शुभेच्छा, आभार व सूचना

 सर्वांचे आभार की सर्वांनी आपल्या सहभागामुळे स्पर्धा यशस्वी पार पडली : सीए मंजुनाथ साव्यान्नावर

अभिनंदन अशासाठी आपण आपला सर्वोत्तम खेळ खेळलात. कोल्हापूर 11 म्हणता- म्हणता आता कोल्हापूर 50 झाली आहे. (भविष्यात सर्व शहरावर लिंगायत स्पर्धेत आपली कोल्हापूरची टीम असेल).

एका पेक्षा एक सुरेख खेळाडू आपल्या समाजात आहेत आणि लिंगायत प्रीमिअर लीग स्पर्धा कोणत्या समाजा सारखी वाटली नाही , प्रेक्षक म्हणत होते की किती सुरेख खेळ करत आहेत. ही काय राज्यस्तरीय प्रोफेशनल स्पर्धा आहे काय अजून आपल्या खेळाडूंसाठी ह्या पेक्षा वेगळं complement असू नाही शकत. बरेच खेळाडू आता पश्चाताप करून घेत आहेत की ते प्रॅक्टिस ला आले नाहीत. आणि काहींनी पुढील वर्षी साठी आत्ताच फॉर्म च्या लिंक मागणी सुरू केली आहे.

पहिल्या प्रयत्नातच एवढी चांगली स्पर्धा आणि ती ही यूट्यूब द्वारे पार पडली आहे. खुप छान वाटले….कोण जिंकले कोण हरले यापेक्षा आपल्या समाजात देखील एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत हे पाहून आनंद वाटला….असेच कायम एकत्र रहुयात आणि आपल्या लिंगायत समाजाचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करूयात…..

श्री बसव लिंगाय नमः

कोल्हापूर लिंगायत प्रीमिअर लीग 2024 यशस्वी रीतीने पूर्ण करण्यामध्ये ज्यांनी मदत केली असे प्रायोजक, संघ मालक, खेळाडू या सर्वांचे मनापासून आभार . विशेषतः आभार  कौतुक महाराष्ट्रात नावाजलेले खेळाडू ऋषिकेश माळी,गजानन गुरव यांच्या बरोबर खेळण्यास आणि यांचे मार्गदर्शन नवीन तरुण खेळाडू ना मिळाले. आपल्या लिंगायत समाजातील इतके चांगले नावाजलेले आणि सुनियोजित खेळाडू आहेत आणि यापुढे पूर्ण अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये असतील याचा गर्व असेल.

सर्वांचा परिचय,सर्वांची मदत,ओळख झाली

क्रिकेट स्पर्धा हे निमित्त पण या मधून आपल्या समाजामध्ये चांगले व्यक्तिमत्त्व, खेळाडू, व्यावसायिक, सामाजिक कार्य करणारे आहेत आणि यामधून सर्वांचा परिचय,सर्वांची मदत,ओळख झाली.
यापुढे ही आपले सहकार्य आपल्याच समाजासाठी, समाजातील खेळाडू, व्यवसायिक, तरुण पिढी आणि सामाजिक कार्यासाठी निःस्वार्थी असावे आणि आवर्जून समाजातील व्यक्तीलाच करावे जेणे करून आपला समाज पुढे जाईल यासाठी आपले सहकार्य आवश्यक.

यापुढे यापेक्षाही मोठी सुनियोजित स्पर्धा आपल्या मदतीने पार पाडू 

यावर्षी स्पर्धा नियोजन करण्यात कोणाचेही मन दुखावणार आणि कोणतीही अडचण येणार नाही यासाठीचे आम्हा सर्वांचे प्रयत्न जर यामध्ये काही कमी असले तर क्षमस्व.

आपले मत, अभिप्राय कळवा जेणेकरून यापुढे आणि चांगले सुयोग्य नियोजन करण्यास मदत होईल.

मंजुनाथ आणि सर्व संयोजक टीम…आपण सर्वांनी खूप मेहनत घेऊन पहिल्या ने झालेल्या “लिंगायत प्रीमियर लीग” या क्रिकेट स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले त्याबद्दल मनापासून अभिनंदन !

दोन दिवसांच्या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या. चांगला खेळ झाला.  समाजातील तरुण खेळाडू मित्रांची पारस्परांशी ओळख आणि मैत्री निर्माण झाली. तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

मंजुनाथ भाऊ यांनी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला

प्रथम स्पर्धा कमिटी आयोजन करणाऱ्या सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन.. तसेच स्पर्धेसाठी ओनर म्हणून ज्यांनी योगदान दिले त्यांचेही खूप खूप अभिनंदन… अभिनंदन एवढ्यासाठी की कमी वेळामध्ये एक उत्कृष्ट स्पर्धा पार पडली… तसेच ओपन (खुल्या) स्पर्धा किंवा ग्रामीणस्तरीय (गाववाईज) स्पर्धा अशा स्पर्धा घेणे सोपे आहे. परंतु यापूर्वी कधीही न झालेल्या लिंगायत समाजाच्या मुलांना एकत्र करून अशा प्रकारचे स्पर्धा घेणे एवढे सोपे नाही… या सर्व गोष्टीचं श्रेय एकच मंजुनाथ सवेनवार यांना जात..कारण खूप दिवसापासून हा माणूस राबत आहे.अशा प्रकारच्या स्पर्धा होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मंजुनाथ भाऊ यांनी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे… भविष्यात यातूनच चांगले चांगले प्लेयर तयार होतील…. मंजु भाऊ यांना सागर कुरबट्टी तसेच विनायक वाले सत्यम मुरदंडे यांनी चांगली साथ दिली…

पुढील वर्षी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा

 स्पर्धा खेळवणे स्पर्धा जिंकणे स्पर्धा हरणे यांचा यामध्ये मोठीव नव्हता परंतु स्पर्धा पार पाडणे हा एकच उद्देश होता… जिंकलेल्या खेळाडूंचे तसेच होणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन…. तसेच पराभूत झालेल्या संघांना माझ्या शुभेच्छा पुढील वर्षी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा आपणही विनर होऊ शकता…

You may also like

error: Content is protected !!