कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….!

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर 'अष्टपदी' चित्रपटाचा मुहूर्त : - प्रसिद्धी पत्रकारद्वारे माहिती

कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….!

– प्रसिद्धी पत्रकारद्वारे माहिती

कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

दक्षिणेकडे बॅाक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर घातली मोहिनी 

मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स आॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई ४’ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी ‘अरनमानाई ४’ हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले असून, आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे., अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट

‘अरनमानाई ४’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा ‘अरनमानाई ४’ पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री  मुख्य भूमिकेत

आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ई. कृष्णसामी यांची सिनेमॅटोग्राफी आणि हिप-हॉप तमिझाद्वारे तयार केलेल्या हळूवार साउंडट्रॅकमुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिकच गडद बनते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.

दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय

दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या ‘अरनमानाई ४’ या चित्रपटाने केवळ व्यावसायिक पातळीवर यश संपादन केले नसून, भारतीय सिनेमाच्या कथाकथन क्षमतेच्या कक्षाही रुंदावण्याचे काम केले आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने ‘अरनमानाई ४’ हिंदीत डब करण्यात आला आहे. अनोख्या आणि शक्तिशाली कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी कार्मिक फिल्म्स ही निर्मितीसंस्था ओळखली जाते. २४ मे रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन ‘अरनमानाई ४’ पाहायला विसरू नका. मोठे डाव आणि अशांत आत्मे असलेल्या एका अलौकिक प्रवासासाठी सज्ज व्हा.

????????————————————-????????

????????————————————-????????

????????————————————-????????

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त

अष्टपदी’च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा

साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘अष्टपदी’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘अष्टपदी’ हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक ‘अष्टपदी’ असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागं होतं. ‘अष्टपदी’च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे., अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पटकथेत प्रेमाचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू पाहायला मिळणार

महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ या वेगळ्या विषायावर आधारलेल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘अष्टपदी’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्कर्ष जैन स्वत: सांभाळणार आहेत. जुहू येथील आजीवासन स्टुडिओमध्ये गणेशगीताच्या ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा मुहूर्त आणि घोषणा करण्यात आली. गीतकार गणेश चेऊलकर यांनी लिहिलेलं ‘तू सुखकर्ता विघ्नहर्ता दे स्वरदान गणपती…’ हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं अहे. मृण्मयी फाटक आणि अभिजीत कोसंबी यांच्या आवाजातील या गाण्याला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलं आहे. गीत ध्वनीमुद्रण अवधूत वाडकर यांनी केलं आहे. या चित्रपटाबाबत उत्कर्ष जैन म्हणाले की, चित्रपटाची कथा ‘अष्टपदी’चा खरा हिरो आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमकथेला साजेशी श्रवणीय संगीताची किनार जोडण्याचं सुरेख काम मिलिंद मोरे यांनी केलं आहे. ‘अष्टपदी’च्या पटकथेत प्रेमाचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने कलाकारांची तगडी फळी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असून, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि नेत्रसुखद सादरीकरण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेल अशी आशाही उत्कर्ष यांनी व्यक्त केली आहे.

अष्टपदी’च्या कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू

‘अष्टपदी’च्या कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यानंतर लगेच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ची कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून, कला दिग्दर्शक निलेश रसाळ आहेत. डिओपी धनराज वाघ सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. चित्रपटातील गीतांना संगीत देण्यासोबतच पार्श्वसंगीताची जबाबदारीही मिलिंद मोरे यांनी सांभाळली आहे. मेकअप अतुल शिधये करणार असून, अजय खाडे कार्यकारी निर्मात्याचं काम पाहणार आहेत. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत.

You may also like

error: Content is protected !!