“बनावट पार्ट विक्री” प्रकरणी वाकड पोलीसांची मोठी कारवाई
– 3 लाख 49 हजार 741 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
– होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा.लि. कंपनीचे बनावट पार्ट विक्री प्रकरणी पोलिसांची धाड : कॉपीराईट कायदया प्रमाणे कायदेशीर कारवाई
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).
बनावट पार्ट विक्री प्रकरणी वाकड पोलीसांनी मोठी कारवाई करुन एकूण 3 लाख 49 हजार 741 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. क्रांतिवीर नगर, थेरगाव, पुणे येथील बिल्डींगच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा.लि. कंपनीचे बनावट पार्ट विक्री प्रकरणी पोलिसांनी धाड टाकली. बनावट पार्ट विक्री करणाऱ्या संबंधितांवर कॉपीराईट कायदया प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
माहितगाराकडून मिळालेली माहिती अशी…
दि. 18/04/2024 रोजी, आमच्या कंपनीच्या एका माहितगाराकडून, मिळालेली अशी, आमचे स्वामित्त्व असलेल्या वरील नमूद कंपन्यांचे बनावट स्पेअरपार्टची विक्री (पिंपरी चिंचवड, पुणे) शहरातील N.C.R.B (एन.सी.आर.बी) I.I.F.-I (एकत्रित समान फॉर्म – १) क्रांतिवीर नगर, धेरगाव, पुणे येथील एका इमारतीचे गोडाऊनमधुन लोकांना केली जाते.
वाकड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना कारवाई करण्याचे आदेश
वरील माहितीनुसार दि. 19/04/2024 रोजी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांना लेखी स्वरुपात कारवाई करणेबाबत त्यांना अर्ज केला होता. सदर अर्जाप्रमाणे क्रांतिवीर नगर, थेरगाव, पुणे यांनी वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सदर अर्जाप्रमाणे कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने आम्हास दि. 09/05/2024 रोजी वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे येवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटलो असता, त्यांनी आमच्या मदतीस पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण, वाकड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांनी आमच्या कागदपत्राची पडताळणी केली. त्यानंतर आम्ही त्यांना छाप्याचा आशय समजावुन सांगितला.
छापा कारवाईचा थोडक्यात आशय
चाकड पो तदनंतर पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांनी त्यांच्या स्टाफकरवी, लागलीच दोन इसमाना पंच पंच म्हणुन हजर करण्यास सांगितले. पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांच्या आदेशान्वये त्याच्या स्टाफने दोन पंचास बोलावुन आम्हा सर्वासमक्ष हजर केले असता, त्यांना करावयाचे छापा कारवाईचा थोडक्यात आशय समजावुन सांगुन पंच म्हणून हजर राहण्याची विनंती केली असता, पंचानी होकार दर्शविल्यानंतर, पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांनी त्यांचा स्टाफ, पोलीस अंमलदार पोहवा. 2924 गिरे, पोहवा. 940 साबळे व पोहवा. 1118 कदम, पंच, तसेच मी व माझा सहकारी नामे कमलेश विठ्ठल पायगुडे, वय 42 वर्षे, रा. मु.पो. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे असे आम्ही सर्वजन माझ्याकडील खाजगी वाहनाने दुपारी 18.30 वाजता आम्ही सर्व मिळुन प्रथम क्रांतिवीर नगर, थेरगाव, पुणे येथे गेलो व तेथील बिल्डगच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये असलेले इसमास पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांनी त्यांची व आमची ओळख करुन देवुन त्यांचे व आमचे ओळखपत्र व आमच्याकडील कागदपत्रे दाखवुन छाप्याचा आशय समजावून सांगुन आमच्यासमोर गोडाऊन मधील व्यक्तीला त्याचे नाव पत्ता विचारला असता, त्याने त्यांचे नाव पत्ता गोविंद वनाराम सिरवी, वय 30 वर्षे, धंदा व्यापार, रा. हिना हेरिटेज, तिसरा मजला, तापकीर चौक, काळेवाडी, पुणे. मुळ रा. खार्ची, ता. मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले. त्याच्या गोडाऊन मध्ये जावुन त्याच्या समक्ष पाहणी केली असता ते बनावट होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कुटर इंडिया प्रा.लि. चे पार्टस् मिळुन आल्याने त्याचे वर्णन खालीलप्रमाणे,
बनावट होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कुटर इंडिया प्रा.लि. चे पार्टस् : एकूण 3 लाख 49 हजार 741 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
1) 2,93,728/- रुपये कि. चे एकुण 1072 किट त्यामध्ये प्रत्येकी 11 नग, होंडा कंपनीचे लिंक बुश किट, प्रत्येकी किंमत 274/- रुपये.
2) 3,120/- रुपये कि.चे एकुण 20 नग, होंडा कंपनीचे एअर फिल्टर, प्रत्येकी किंमत 156/- रुपये. 3) 33,000/- रुपये कि. चे एकुण 500 किट, त्यामध्ये 04 नग, होंडा कंपनीचे डिस्क रबर, प्रत्येकी किंमत 66/- रुपये.
4) 2,080/- रुपये कि. चे एकुण 52 नग, होंडा अॅक्टीवा मोनोग्राम, प्रत्येकी किंमत 40/- रुपये. 5) 1,393/- रुपये कि. चे एकुण 199 नग, होंडा कंपनीचे डिस्क पॅड स्टिकर पाऊच व त्यावर एमआरपी स्टिकर असलेले, प्रत्येकी किंमत 7/- रुपये.
6) 420/- रुपये कि.चे एकुण 60 नग, होंडा कंपनीचे लिंक बॉश किट स्टिकर पाऊच व त्यावर एमआरपी
स्टिकर असलेले, प्रत्येकी किंमत 7/- रुपये. 7) 16,000/- रुपये किं. ची एक सिलींग मशिन जु.वा.किं.अं.
3 लाख 49 हजार 741 रूपये एकूण किंमतीचा मुद्देमाल.
येणे प्रमाणे वरील किंमतीचा बनावट मुद्देमाल पोलीस उप निरीक्षक, सचिन चव्हाण यांनी पंचासमक्ष पाहणी करुन वरीलप्रमाणे मुद्देमाल गोण्यात पॅक करुन पंचनाम्याने त्यावर त्यांचे व पंचाचे सहीचे कागदी लेबले लावुन जप्त केले आहे.
ओरीजनल असल्याचे भासवुन ग्राहक व कंपनीची फसवणुक करुन त्याची विक्री
तरी दिनांक 09/05/2024 रोजी 18:30 वा. चे सुमारास संजू बारणे यांचे बिल्डगमधील तळमजल्यावरील गाळा, क्रांतिवीर नगर, थेरगाव, पुणे पुणे येथे इसम नामे गोविंद वनाराम सिरवी, वय 30 वर्षे, धंदा व्यापार, रा. हिना हेरिटेज, तिसरा मजला, तापकीर चौक, काळेवाडी, पुणे. मुळ रा. खार्ची, ता. मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान याने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी होंडा मोटार सायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा.लि. कंपनीचे एकुण – 3,49,741/- रुपये किंमतीचे बनावट स्पेअर पार्टस व होंडा नावाचे प्लॅस्टिक स्टिकर पाऊच हे गाळ्यामध्ये विक्रीसाठी ठेवुन ते ओरीजनल असल्याचे भासवुन ग्राहक व कंपनीची फसवणुक करुन त्याची विक्री करीत असताना मिळुन आले म्हणुन माझी त्याचेविरुध्द भा.दं. वि. कलम 420, कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51, 63 प्रमाणे कायदेशीर तक्रार आहे.
पोलीस विभागाची मदत घेवून कॉपी राईट हक्क उल्लंघन कारवाई
मी रेवननाथ विष्णु केकान, वय-४१ वर्षे, धंदा-नोकरी, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे २८ मो. नं. 8668228008. सर्वे न. 37/14, सद्गुरु निवास, साई कॉलनी. समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब लिहून देतो की, मी SPEED search & security networks pri. Itd पत्ता स्पिड टॉवर, क्तक 15 फेज-9, सेक्टर-63, एस. ए. एस. नगर, मोहाली 160052 पंजाब (चंदीगड) या कंपनीत 12 वर्षापासुन ऑपरेशन हेड म्हणून या पदावर कार्यरत आहे. माझी कंपनी आम्हाला दिलेल्या कॉपी राईट हक्काचे जर कोणी उल्लंघन करीत असेल तर त्याचेविरूध्द कॉपीराईट कायदया प्रमाणे कायदेशीर कारवाई करीत असतो. त्याबाबतचे आम्हाला होंडा मोटार सायकल अँण्ड स्कुटर इंडिया प्रा.लि. चे अधिकार पत्र प्राप्त असून, त्यानुसार आम्ही, आम्हास दिलेल्या संबंधीत राज्यामध्ये वरील कारवाईकामी पाहणी करून त्याप्रमाणे संबंधीत पोलीस विभागाची मदत घेवून कारवाई करीत असतो. तसेच कॉपी केलेल्या मालाचे प्राथमिक ओळख करण्याचे मला आमचे कंपनीकडुन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.