जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक महोत्सव १० मे रोजी

- मठातील प्रतिनिधी सुरेश मगदूम यांची माहिती : महामस्तकाभिषेक समितीकडून आयोजन

जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक महोत्सव १० मे रोजी

– मठातील प्रतिनिधी सुरेश मगदूम यांची माहिती : महामस्तकाभिषेक समितीकडून आयोजन
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4”- विशेष प्रतिनिधी ).

जैन मठात नयनमनोहर १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे.  हा ६३ वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधील प्रत्येक मंदिराकडे पूजेचे नियोजन देण्यात येणार आहे.ह्यावर्षी केसापुर जैन मंदिरकडे पूजेचे नियोजन देण्यात आले आहे.,  अशी माहिती मठातील प्रतिनिधी सुरेश मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

महामस्तकाभिषेकास सुरुवात…

यावेळी सुरेश मगदूम म्हणाले,  १० मे रोजी मांगलिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यामध्ये सकाळी ६.०० वाजता मंगल वाद्य घोष, ध्वजारोहण, ८.३० वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर अभिषेक, श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक व षोडशोपचार पुजा आणि दुपारी २.०० वाजता आचार्यश्रींचे प्रवचन, ४.०० वाजता भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेकास सुरुवात होणार आहे.

मंगलमय आणि धार्मिक कार्यक्रम

यामध्ये पंचामृत, प्रथम कलश, नारळपाणी, इक्षुरस, आमरस, दुग्धाभिषेक, सर्वोषधि, कल्कचूर्ण, कषायचूर्ण, श्वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, पूर्ण सुगंधित कलाभिषेक असे परंपरेनुसार अभिषेक करण्यात येणार आहेत.  तसेच शांतीधारा, ईशान्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य असे चतुषकोन कलशाने अभिषेक होतील. त्यानंतर मंगल आरती, पुष्पवृष्टी आणि रत्नवृष्टीने या मंगलमय आणि धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल.

महामस्तकाभिषेक सोहळ्याला हजारोच्या संख्येने समाजबांधवांची

उपस्थिती

या मस्तकाभिषेक सोहळ्यासाठी चर्याशिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज ससंघ(२९ पिंचि)यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. तसेच ज्योतिषाचार्य परमपूज्य प्रणामसागरजी महाराज ससंघ हे सुद्धा या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. तरी सर्वांनी यात सहभागी होऊन अपार सम्यक पुण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महामस्तकाभिषेक समितीच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू येथील कोल्हापूर सांगली सातारा रायबाग, बेळगाव, जिनकंची या मठातून लोक हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस भरतेश सांगरुळकर, कारभारी धनंजय मगदूम, नेमिनाथ कापसे, संजय आडके, संजय कापसे, संजय कोठावळे, अशोक रोटे, अनघा सांगरुळकर, ज्योती शेट्टी, पद्मा घोडके, रूपाली पत्रावळे, संमती हंजे यांच्यासह महा मस्तकाभिषेक समितीचे पदाधिकारी व महिला उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!