खर्च निरीक्षक चेतन आर.सी. व हरीशा वेलंकी यांच्या विविध कक्षांना भेटी

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले स्वागत

खर्च निरीक्षक चेतन आर.सी. व हरीशा वेलंकी यांच्या विविध कक्षांना भेटी

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले स्वागत

कोल्हापूर  : ( दि.12 एप्रिल 2024)  : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी ).

लोकसभा निवडणूक 2024 चे खर्च निरीक्षक चेतन आर.सी. व हरीशा वेलंकी यांनी शुक्रवारी निवडणूक विषयक विविध कक्षांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

खर्च निरीक्षकांनी दिल्या सूचना

यावेळी खर्च निरीक्षक चेतन आर.सी. व हरीशा वेलंकी यांनी खर्च नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष आदी कक्षांना भेट देवून कामकाजाची माहिती घेतली. राजकीय जाहिराती व त्यावरील होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने नियमित माहिती सादर करा, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक स्तरावरील दैनिकातून प्रसिध्द जाहिराती व बातम्यांवर बारीक लक्ष ठेवावे. अशा सूचना खर्च निरीक्षकांनी दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, खर्च समिती नोडल अधिकारी अतुल अकुर्डे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माध्यम कक्षातील कामकाजाची माहिती जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी सचिन अडसूळ यांनी दिली. नागरिकांना, मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रारी करण्यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने नेमलेल्या निवडणूक निरीक्षकांची नावे, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी देण्यात येतो आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

47 कोल्हापूर – सर्वसाधारण –
श्री. रोहित सिंग, आय.ए.एस.
9425010631 [email protected]

48 हातकणंगले – सर्वसाधारण –
श्री. संदीप नंदुरी, आय.ए.एस.
9840410000 [email protected]

47 कोल्हापूर आणि 48 हातकणंगले पोलीस –
श्री. विवेकानंद शर्मा, आय.पी.एस. –
9437297600 [email protected]

47 कोल्हापूर व 48 हातकणंगले खर्च निरीक्षक –
चेतन आर. सी. आयआरएस 9930936537 [email protected]

47 कोल्हापूर व 48 हातकणंगले खर्च निरीक्षक –
हरिशा वेलंकी, आयआरएस
9701370109 [email protected]

You may also like

error: Content is protected !!