श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्साहात
– श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा निमित्त १ ते १० एप्रिल २०२४ या काळात संभाजीनगर येथील मगरमठी मंदिर येथे सुरू आहेत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
– उद्या बुधवार दि. 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार महाप्रसाद वाटप
कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज 4” : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा निमित्त दि. १ ते १० एप्रिल 2024 या काळात मगरमठी मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. या अंतर्गत मंगळवारी सायंकाळी श्री शेषनारायण मंदिर ते मगरमठी संभाजीनगर पारंपारिक वाद्याच्या व टाळ्यांच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्या बुधवार दि. 10 एप्रिल 2024 रोजी सोहळ्याची सांगता होणार असून दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे यंदाचे ३६ वे वर्ष
मगरमठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. यामध्ये सातत्य राखत गेल्या दहा दिवसांपासून मगरमठी मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. या अंतर्गत निमित्ताने पूजापाठ, श्री स्वामी समर्थ सहस्त्रनामावली, भजने, लघुरुद्र, पालखी सोहळा व महाप्रसाद आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी पालखी सोहळा पारंपरिक वाद्यांच्या व टाळ्यांच्या गजरात उत्साहात पार पडला. पंचगंगा नदी येथे अभिषेक घालून श्री स्वामी समर्थांची पालखी शेषनारायण मंदिर येथे आणण्यात आली. पुढे ही पालखी शाहू बँक चौक, नंगीवली चौक मार्गे मगरमठी येथे आणण्यात आली. उद्या सोहळ्याचा अखेरचा दिवस असून प्रकट दिनानिमित्त पाळणा दुपारी बारा वाजता तर १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, मगरमठी व संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.