विनायकराव क्षीरसागर यांचे निधन

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (वय ८८ वर्षे ) यांचे दि.२४.०३.२०२४ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. कै.विनायकराव क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होईल.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन केले. यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, रामदास कदम, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फोनद्वारे सांत्वन केले. तर छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, समरजितराजे घाटगे, प्रतापसिंह जाधव, अरुण डोंगळे, नाना कदम, सुजित चव्हाण, आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले.

You may also like

error: Content is protected !!