महायुतीच्या उमेदवारास विजयी करण्याचा निर्धार

- कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप बूथप्रमुखांच्या बैठकीत ठाम निर्णय

महायुतीच्या उमेदवारास विजयी करण्याचा निर्धार

– कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप बूथप्रमुखांच्या बैठकीत ठाम निर्णय

कोल्हापूर :  (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने होऊ घातलेल्या लोकसभा- 2024 च्या निवडणुकीत “आपकी बार  400 पार” चे लक्ष ठेवले आहे. यासाठी राज्याचे नेते कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी जो उमेदवार निश्चित करतील  त्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्धार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील बुधप्रमुखांची बैठक चंद्रे (ता. राधानगरी) येथील भाजप कार्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीतच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष बी. एस. पाटील होते.
या बैठकीत आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी विस्तारक स्वप्निल जरग यांनी बुथ स्तरावर करावयाच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हा सोशल मिडिया प्रमुख महेश पाटील यांनी प्रभावी सोशल मिडियाचा वापर कसा करावा, यासाठी विविध ॲपची माहिती सांगितली.
योजना जनतेपुढे घेऊन जाऊन जनजागृती करा : कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष बी. एस. पाटील.

भाजपा व मित्र पक्ष युतीच्या वतीने केंद्रातून व राज्यातून राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्या योजना जनतेपुढे घेऊन जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघाचा मोठा वाटा असायला पाहिजे. यासाठी महायुती देईल त्या उमेदवारांना निवडून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष युवा मोर्चा बाळासाहेब पाटील, ओबीसी आघाडी प्रमुख महादेव कांदळकर, राधानगरी कार्यकारी सदस्य सातापा धनवडे, बुथ प्रमुख अशोक खोत, पदवीधर पदवीधर आघाडी प्रमुख विनोद कुलकर्णी, व्यापारी आघाडी प्रमुख युवराज चिंदगे, बुथ प्रमुख शरद पाटील, प्रमुख प्रमुख उत्तम पाटील, जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा विशाल किल्लेदार, बूथ प्रमुख कासोटे, शांताराम तौंदकर, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा विनायक भोई,राधानगरी भुदरगड स्वप्निल जरग, चंद्रेचे माजी उपसरपंच नेताजी साठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!