शहरासह उपनगरात पारंपरिक पद्धतीने होळी सण उत्साहात साजरा
– दिवसभर टिमक्या वाजवण्याचा आनंद घेत ठेक्याच्या तालावर थिरकला बालचमू
– सायंकाळनंतर तरुण मंडळांच्या मोठ्या होळी पेटवून मारली बोंब : साऊंड सिस्टिमच्या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शहरासह उपनगरात पारंपरिक पद्धतीने होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर टिमक्या वाजवण्याचा आनंद घेत ठेक्याच्या तालावर बालचमू थिरकला. सायंकाळनंतर तरुण मंडळांच्या मोठ्या होळी पेटवण्यात आल्या. होळी सभोवती बोंब मारून होळी युवा वर्गाने पारंपरिक पद्धतीने साजरी केली. होळी पेटल्यानंतर होळी सभोवती फेरफटका मारत बोंब मारली. यानंतर साऊंड सिस्टिमच्या गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकली.
होळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी दोन दिवस अगोदरपासून बालचमू त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यासाठी परिश्रम घेत होता. गेल्या तीन दिवसांपासून गल्ली-बोळात घुमणारी चमकीचा कडकडात रात्री उशिरापर्यंत घुमला होता.