“काँग्रेस”च्या बालेकिल्ल्यात “भाजपा”ची एन्ट्री..! 

- "काँग्रेस"ला सोडचिट्टी देत राधानगरी तालुक्याचे पंचायत समिती माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांचा हजारो समर्थकांसह "भाजपा" पक्षप्रवेश : शेतकरी व युवक मेळावा उत्साहात : रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

 

“काँग्रेस”च्या बालेकिल्ल्यात “भाजपा”ची एन्ट्री..! 

– “काँग्रेस”ला सोडचिट्टी देत राधानगरी तालुक्याचे पंचायत समिती माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांचा हजारो समर्थकांसह “भाजपा” पक्षप्रवेश

– शेतकरी व युवक मेळावा उत्साहात

– रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

“काँग्रेस”ला सोडचिट्टी देत राधानगरी तालुक्याचे पंचायत समिती माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांचा हजारो समर्थकांसह “भाजपा” पक्षप्रवेश केला. यावेळी नेत्रदीपक आतषबाजी करून समर्थक व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आयोजत शेतकरी व युवक मेळावा उत्साहात पार पडला. पक्षप्रवेशानंतर रविश उदयसिंह पाटील (कौलवकर) यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना ना. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, देशात युवा पिढीचा 80% एवढा मोठा वर्ग आहे. युवा पिढीसह महिला वर्गाला देशाचे उज्वल भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे साकार होताना दिसत आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. जो असे करणार नाही, त्याला पहिल्यांदा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्टीला कर्तव्याला अधिक महत्त्व आहे.  राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी रविश पाटील हे छोटे नेते नाहीत, तर ते छोटे पॅकेट मे.. बडा धमाका है…! कौलवकर कुटुंबीयांनी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राधानगरी तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह विकासात्मक जडणघडणीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्यामुळे भाजपा पक्षाला राधानगरी तालुक्यात ताकद मिळली आहे. रविश यांना कोणतीही ईडीची नोटीस आलेले नाही. तरीही त्यांनी प्रेरणादायी उज्वल भविष्य व नवीन झपाट्याने होणारे विकासात्मक बदल याचा विचार करून पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशामुळे आता त्यांच्या पाठीशी भाजपा पक्षाची संपूर्ण ताकद उभी असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी नवीन नेतृत्वाला संधी व त्यांना पुढे आणण्यासाठी जबाबदारीसह प्रोत्साहन देणारा भाजपा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले.

नूतन जिल्हा उपाध्यक्ष रविश पाटील यांनी पक्षप्रवेश व उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर आपल्या मनोगतामध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासून कौलवकर कुटुंबीयांच्या राधानगरी तालुक्याच्या विकासात्मक , राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. आमच्या कुटुंबीयांनी एखादी विचारधारा स्वीकारली तर विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याची परंपरा जोपासली असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरू असलेल्या देशाच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपा पक्षात महिला वर्गासह युवा पिढीला नवीन बदल व उज्वल भविष्य दिसते आहे. पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला, असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील,  विलास रणदिवे, विलास जाधव, लहू जरग, संभाजी आरडे, डॉ. सुभाष जाधव, धीरज करलकर, सविता पाटील, राधानगरी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील, ठिकपुर्लीचे माजी सरपंच चंद्रकांत संकपाळ आदींसह भारतीय जनता पार्टी राधानगरी तालुका सर्व पदाधिकारी, समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!