निधन वार्ता
रणधिर खराडे
शिवाजी पेठेतील सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाचे माजी शहराध्यक्ष रणधिर महादेवराव खराडे (वय 50) यांचे आकस्मिक निधन झाले. ते शिवाजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सखारामबापू खराडे यांचे पुतणे होत. त्यांच्या चांगल्या व बोलक्या स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जमविला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुली असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन : पंचगंगा स्मशानभूमी येथे बुधवार दि.20 मार्च 2024 सकाळी 9 वाजता होणार आहे.