मुट कोर्टमुळे कायद्याचा सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत
– न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे प्रतिपादन
– शिवाजी विद्यापीठात मुट कोर्ट स्पर्धा उत्साहात
– शिवाजी विद्यापीठासह नऊ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून कोर्टात युक्तिवाद कसा करावा. याचा प्रत्यक्ष अनुभव मुटकोर्टद्वारे विद्यार्थ्यांना मिळतो. यामुळे सक्षम विद्यार्थी तयार होण्यास मोलाची मदत मिळते. सध्याच्या काळात अशा उपक्रमाची नितांत गरज आहे., असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ विधी विभागाच्या वतीने मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे, जिल्हा न्यायाधीश ए. एस. वाईकर आदींसह उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा न्यायाधीश एस आर साळुंखे बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश एस आर साळुंखे म्हणाले, कायद्याची पदवी घेतल्यानंतर लवकर लवकर सक्षम होण्यासाठी मुटकोर्ट स्पर्धा उपक्रमात सहभाग घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यानंतर बोलताना जिल्हा न्यायाधीश ए. एस. वाईकर यांनी विधी पदवीधर व युवा वकिलांनी आयुष्यात यशस्वी वकील व्हायचे असल्यास कायद्याच्या ज्ञानाबरोबरच सभोवतालच्या घडामोडी कडे लक्ष ठेवून चौफेर ज्ञान बाळगणे गरजेचे आहे . वकिलांची कर्तव्य न्यायालयीन अधिकार विधी शिक्षणानंतरच्या संधी याबरोबरच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून यशस्वी होण्यासाठी कार्य आणि जबाबदारी याची सविस्तर माहिती सांगितली.
विद्यापीठ विधी विभाग प्रमुख डॉक्टर विवेक धुपदाळे यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोर्टात कसा युक्तिवाद करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे महत्त्वाचे असते. यासाठी विधी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगितले.
परीक्षक म्हणून यांनी पाहिले काम
नववी राष्ट्रीय मुट कोर्ट व वाद विवाद निवारण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा न्यायाधीश श्री एस आर साळुंखे एएस वाईकर व इतर न्यायाधीश व्ही पी गायकवाड, एस ए बाफना, के आर सिंघेल , पी.आर. राणे,एस बी देवरे, पी एल गुप्ता. ज्येष्ठविधीज्ञ गिरीश नाईक , माधव आचार्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
शिवाजी विद्यापीठासह नऊ महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
या राष्ट्रीय स्तरावरील मुट कोर्ट व वाद विवाद निवारण स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठासह नऊ महाविद्यालयाने भाग घेतला. सदर स्पर्धेचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे : एलएल.बी. मुट कोर्ट विजेतेः व्ही. एम. साळगांवर कॉलेज ऑफ लॉ, पणजी, गोवा, उपविजेतेः शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. एलएल.एम. मूट कोर्ट विजेतेः डिपार्टमेंट ऑफ लॉ, शिवाजी विद्यापीठ, उपविजेतेः ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा. मेडिएशन रोल प्ले विजेतेः शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर, उपविजेतेः डिपार्टमेंट ऑफ लॉ, शिवाजी विद्यापीठ बेस्ट रिसर्चर एलएल.बी. मूट कोर्टः नेहा एस. पोंबुफेंकर,व्ही.एम. साळगांवकर कॉलेज ऑफ लॉ, गोवा. बेस्ट रिसर्चर एलएल. एम. मूट कोर्टः प्रियांका वसंतराव निकम,ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा. बेस्ट मूटर एलएल. बी. मूट कोर्टः माहेश्वरी डी.गुंडेवाडी, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. बेस्ट मृटर एलएल.एम. मूट कोर्टः मतकर सौरभ वामन,ईस्माईलसाो मुल्ला लॉ कॉलेज, सातारा. बेस्ट मेडिएटरः साईष्णू सुयोग पंडित, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ.
कार्यक्रमाचे संयोजन आर नारायण यांनी केले. आभार डॉक्टर विवेक धुपदाळे यांनी मानले. यावेळी ऍड. प्रमोद दाभाडे, कपाले, रोहिदास भांगरे,गौरव जवळकर महेंद्र चव्हाण कार्तिक कुलकर्णी, देवदास चौगुले जयदीप कदम नागेश दरेकर अश्विनी पाटील यासह विधी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.