व्हनाळी उपसरपंचपदी ओंकार कौंदाडे बिनविरोध
(कोल्हापूर : “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
ग्रामपंचायत मौजे व्हनाळी ता. कागलच्या उपसरपंचपदी ओंकार पांडुरंग कौंदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सरपंच दिलीप कडवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संग्राम खाडे यांनी काम पाहिले. स्वागत एम. टी. पोवार यांनी तर आभार सदस्य क्रांती वाकुडे यांनी मानले.
ठरल्याप्रमाणे उपसरपंच अरुण पोवार यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ओंकार कौंदाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली. यावेळी के. बी. वाडकर, शिवाजी जाधव, हिंदुराव जाधव, जयसिंग हत्रोटे, बळवंत वाडकर, चंद्रकांत कौंदाडे, सदस्य नामदेव गुरव, कविता वाडकर, इंदुबाई दंडवते, अश्विनी जांभळे, संजय वाडकर आदी उपस्थित होते.