फोरव्हीलर मेकॅनिक महामेळावा 11 मार्च रोजी

- कोल्हापूर जिल्हा फोरव्हीलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव बाहुबली खोत यांची माहिती

फोरव्हीलर मेकॅनिक महामेळावा 11 मार्च रोजी

– कोल्हापूर जिल्हा फोरव्हीलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव बाहुबली खोत यांची माहिती

– उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष : कोल्हापूर सांगली साताऱ्यासह कर्नाटकातील असोसिएशन संलग्नित सुमारे 1 हजार मेकॅनिकल महामेळाव्याला उपस्थित लावणार

कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर जिल्हा फोरव्हीलर वर्कशॉप ओनर वेन्फेअर असोसिएशनतर्फे सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती असोसिएशनचे सचिव बाहूबली खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, असोसिएशनची स्थापना 2016 साली झाली असून उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाला न्यू पॉलिटेक्निक,  कोल्हापूर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्राध्यापक श्रीधर वैद्य, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत महामेळाव्याचे उद्घाटन व असोसिएशनच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ फोरव्हीलर मेकॅनिकलचा सत्कारही यावेळी होणार आहे. या महामेळावामध्ये स्पेअर पार्ट संबंधित तांत्रिक माहितीचे, विविध कंपन्यांच्या स्पेअर पार्ट्सचे सुमारे 24 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.  या स्टॉल्सवर अध्यायावत स्पेअर पार्टची माहिती व तज्ञांच्या मार्फत डुप्लिकेट स्पेअरपार्ट व ओरिजिनल यातील फरकाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या महामेळाव्याला असोसिएशन संलग्नित कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटकातील असे एकूण सुमारे 1 हजारपेक्षा अधिक मेकॅनिकल उपस्थित राहणार आहेत. तरी असोसिएशन संबंधित सर्व मेकॅनिकल्सनी या महामेळाव्याला उपस्थित राहून उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी खोत यांनी केले. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी 30 पदाधिकाऱ्यांची टीम परिश्रम घेत आहे.

या पत्रकार परिषदेला मार्गदर्शक सुधीर महाजन, अध्यक्ष योगेश पाटील, रमेश जाधव, उपाध्यक्ष अविनाश लाड, योगेश मुळे, सहदेव देवळे, विजय कराळे, सुहास एरुडकर, विनायक कराळे, सुरेंद्र अहिर आदी उपस्थित होते.

दरम्यान, असोसिएशनतर्फे गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये मोफत वाहन दुरुस्ती व तपासणी, झाडे लावा झाडे जगवा, वाहन सुरक्षा सप्ताह अभियान, रक्तदान शिबिर व मोफत नेत्रदान तपासणी अभियान, स्वच्छ सुंदर कोल्हापूर रंकाळा पदपथ स्वच्छता मोहीम, महापुराच्या काळात केलेले कार्य, कोविड काळात केलेले कार्य, पंचमहाभूत लोकोत्सव काळात केलेले कार्य आदींचा समावेश आहे तसेच असोसिएशन संलग्नित मेकॅनिकल करिता टाटा कंपनीतर्फे एक दिवसीय ट्रेनिंग, बॉश कंपनीचे ट्रेनिंग पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळा आदी उपक्रम राबवून त्यांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येतो., अशी माहितीही यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!