भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी उपदेश रवींद्र सिंह
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी (कोल्हापूर जिल्हा – ग्रामीण पश्चिम विभाग) उपदेश रवींद्र सिंह यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवडीचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी 2024). देण्यात आले.
यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष पश्चिम राहुल बजरंग देसाई, राहुल चिकोडे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर उत्तर भारतीय समर्थक समाज बांधवांनी एकच जल्लोष केला. निवड झाल्यानंतर त्यांच्यावर मित्र परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी त्यांना भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीचे प्रदेश सचिवपदी व कोल्हापूरचे प्रभारी डॉ. सुरेंद्र सिंह, अजय सिंह, अजित सिंह, राहुल चौबे, शिवकुमार सिंह, डॉ. अभिलाष सिंह,, उधीर दुबे, रविकांत त्रिपाठी, बबलू गुप्ता आदींसह समाज बांधवांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.