“महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा” चा आज पहिला स्नेहमेळावा

- जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांची माहिती

“महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा” चा आज पहिला स्नेहमेळावा

– जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांची माहिती

– प्रा. डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे “पत्रकारितेची सद्यस्थिती” या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांचे “पत्रकारिता आणि आजची व्यवस्था” या विषयावर उपस्थित पत्रकारांना लाभणार मार्गदर्शन 

– जिल्हा व शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे, “मोफत सभासद नोंदणी”

कोल्हापूर : – ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोल्हापूर जिल्हाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व सदस्य पत्रकारांची पहिली बैठक व स्नेहमेळावा सामानी हॉल,(इंजिनिअरिंग असोसिएशन हॉल) उद्यमनगर,कोल्हापूर येथे बुधवार दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे., अशी माहिती जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिली.

यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे म्हणाले, प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. डॉ. शिवाजी जाधव (समन्वयक एम ए मास कम्युनिकेशन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांचे “पत्रकारितेची सद्यस्थिती” या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांचे “पत्रकारिता आणि आजची व्यवस्था” या विषयावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सदर बैठकीमध्ये आपल्या संघटनेची पुढील दिशा, ध्येयधोरणे तसेच जिल्हा पदनियुक्ती संदर्भात चर्चा व हितगुज करून एकमेकांची ओळख होणार आहे. तसेच भविष्यात पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तरी सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे की, सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे. पत्रकार बांधवांच्या हिताच्या दृष्टीने आपला सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

पुढे बोलताना रुकडे म्हणाले, सदर स्नेहमेळाव्यात जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. तसेच स्नेहमेळाव्याला येणाऱ्या सदस्यांची “मोफत सभासद नोंदणी” केली जाणार आहे. तसेच नोंदणी सकाळी 9.00 वाजता होणार असून सकाळचा नाष्टा व दुपारी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. तरी शहर व जिल्ह्यातील सहभागाची नोंदणी केलेल्या सर्व पत्रकारांनी वेळेत कार्यक्रम स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हा अध्यक्ष रुकडे यांनी केले आहे.

You may also like

error: Content is protected !!