एका नवीन प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा यशस्वी प्रयोग..!

- बिईंग डॉक्टर क्लिनिकचे डॉ युवराज पोवार यांची माहिती

एका नवीन प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा यशस्वी प्रयोग..!

– बिईंग डॉक्टर क्लिनिकचे डॉ युवराज पोवार यांची माहिती

– उपचारापेक्षा प्रतिबंध उपचार प्रभावी : औषधांचे प्रमाण कमी-कमी करत जाऊन बंद करता येणार

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

 आजार होऊच नये किंवा कोणत्याही आजाराच्या प्राथमिक स्टेजलाच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तपासणी करून प्रतिबंध उपचार पद्धती सुरू करून आजाराचे समुळ उच्चाटन करता येऊ शकते. तसेच सुरू असलेली सर्व औषधांचे प्रमाण कमी-कमी करत जाऊन बंद करता येणे शक्य होणार आहे. यासाठी एका नवीन प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे., अशी माहिती बिईंग डॉक्टर क्लिनिकचे डॉ युवराज पोवार यांनी  पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला म्युझिकल लव्हर समूहाचे शिरीष पाटील, श्रद्धा प्रकाश गुळवणी उपस्थित होत्या.

– “प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी” संकल्पना

सध्याच्या स्पर्धात्मक युगात कराव्या लागणाऱ्या धावपळीत अनेक आजारांना तरुण वयातच आमंत्रण मिळते. भविष्यात बळवणाऱ्या आजारांचे संकेत शरीर वेळोवेळी देत असते. हे संकेत ओळखून त्याचवेळी या आजारांना प्रतिबंध केल्यास हे आजार डोके वर काढत नाहीत. यावर सखोल अभ्यास करून यातील प्रयोगांचे यशस्वी दाखले देणारे बिईंग डॉक्टर क्लिनिकचे डॉ. युवराज पोवार यांनी “प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी” ही नवी संकल्पना समोर आणली आहे. यामध्ये त्यांनी शास्त्रीय आधारासोबत वैज्ञानिक पार्श्वभूमीचा चपलख वापर करत ही नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. त्याला आता वैद्यकीय क्षेत्रातून मान्यता मिळत असल्याने कोल्हापूरच्या मेडिकल क्षेत्राला गतिमानता येणार आहे.

उपचारापेक्षा प्रतिबंध उपचार प्रभावी…

या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही आजारापेक्षा त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय चांगले याचा विचार केला आहे. सध्या वयाच्या 40 वर्षापूर्वीच अनेक आजारांचा सामना करावा लागतो हायपर टेन्शन मधुमेह अशा आजारांची प्राथमिक लक्षणे दिसू लागतात. वेळीच ही लक्षणे लक्षात आल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो. एखादे वेळेस रक्तदाबाची गोळी सुरू होते. डायबिटीसचे पथ्य पाणी आणि औषधे सुरू करावी लागतात. किडनीचे विकार जाणवू लागतात. कधी कधी थायरॉईडसारखे आजारही डोके वर काढू लागतात. या सर्वांना लाईफस्टाईल डिसीज म्हणून ओळखले जाते. या आजारांवर ही उपचार पद्धती अमलात आणली असता, या औषधांचे प्रमाण कमी कमी करत जाऊन बंदही करता येते. कमी वयात सुरु झालेला मधुमेह पूर्ण बरा होऊ शकतो. तसेच त्याची औषधेही पूर्णता थांबवता येऊ शकतात. याची बरीच उदाहरणे डॉ. युवराज पोवार यांनी दिली आहेत.

बिईंग डॉक्टर क्लिनिकचे काम..

हायपर टेन्शन, डायबेटीस, हृदय विकारासंबंधी आजार, किडनीचे आजार आणि थायरॉईड अशा आजारांचे आदीम (प्रायमोडियल), प्राथमिक (प्रायमरी), माध्यमिक (सेकंडरी), तृतीय व पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) अशा पाच स्तरांमध्ये विभाजन होते. त्यामधील आजाराच्या आदीम, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर बिईंग डॉक्टर क्लिनिक काम करते.

आजार होऊ नये म्हणून केले जातात 90 टक्के प्रतिबंधात्मक उपचार…

सध्या मेटाबोलिक सिंड्रोमचे प्रमाण वाढते आहे. हायपरटेन्शन डायबिटीस हृदयविकार संबंधित आजार किडनीचे विविध आजार थायरॉईडचे हे आजार बळवताच दवाखान्यात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतात. मात्र, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही उपचार पद्धती घेतल्यास 90 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही. ओपडीमध्येच उपचार झाल्यानंतर रुग्ण घरी जाऊ शकतो. सदरचे आजार होऊ नये यासाठी 90 टक्के प्रतिबंधात्मक उपचार केले जातात. तसेच भविष्यात या आजारातून निर्माण होणारा शारीरिक त्रास उदाहरणात किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, असे प्रसंग उद्भवू नयेत. या पद्धतीने उपचार करता येतात. याला वैद्यकीय भाषेत प्रेडिक्टिव्ह रिस्क अर्थात संभाव्य धोका असे म्हटले जाते. तसेच बीपी, शुगर अशा आजारात घेण्यात येणारी औषधे कमी करणे. तसेच ती काही वेळास पूर्णतः बंद करणे. तसेच आजार थांबवणे अथवा वाढ न होण्यास प्रतिबंधात्मक उपचार या पद्धतीद्वारे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह नियंत्रित करणे उच्च रक्तदाब असेल. तर तो नियंत्रणात आणणे आतील अवयवांना सूज येऊन आजार होणे. तसेच जळजळ होणे यावर वेळीच उपचार केले जातात. या आजारांची जोखीम किती मोठी आहे. त्याचा वेळीच अंदाज लावून त्या रोगाचे निदान केले जाते. तसेच वेळेत उपचारही केले जातात.

बदलत्या जीवनशैलीमुळे जीवघेणे संकट…

हल्ली तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. बदलत्या जीवनशैलीमुळे हे जीवघेणे संकट उडवू शकते. तो टाळण्यासाठी या प्रतिबंधात्मक उपचाराद्वारे मात केली जाते. या पद्धतीने केले जाणारा उपचारावर आता विविध वैद्यकीय परिषदेमधूनही सादर केलेल्या शोधनिबंधात मान्यता मिळत आहे. आणि त्याचबरोबर या संख्येत पेशंट ही बरे झाले आहेत. त्यामुळे ही पद्धती कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राची नवीन ओळख ठरणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पंचक्रोशीत मेडिकल टुरिझम वाढण्यास गतिमानता येणार आहे. असा विश्वासही डॉ. पोवार यांनी व्यक्त केला आहे.

रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन ठरणाऱ्या या संशोधन पर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी उपचार पद्धतीच्या प्रबोधन व प्रचारासाठी येत्या रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी म्युझिक लवर्स ग्रुपच्या वतीने अनोख्या सुर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात हृदय दणदणीत तंदुरुस्त असेल तर आपण सर्व प्राणीमात्रावर जगावर प्रेम करू शकतो.

या “हृदय दिल हार्ट” या मध्यवर्ती संकल्पना वर आधारित विविध सुमधुर गीते सादर केली जाणार आहेत. ये दिल ना होता बेचारा… या नावाने हा शब्दचा हृदय झंकारणारा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात निर्माण प्रवेशिका मधून लकी ड्रॉ काढून तीन विजेत्यांना पैठणीसह आकर्षक अशी बक्षीस दिली जाणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पवार आणि म्युझिकल लवर समूहाचे शिरीष पाटील व श्रद्धा प्रकाश गुळवणी यांनी केले आहे.

You may also like

error: Content is protected !!