कोल्हापुरात प्रथमच “लिंगायत प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे” आयोजन
– स्पर्धा संयोजन प्रमुख मंजुनाथ साव्यानावर यांची माहिती
– श्री बसवेश्वर इंटरनॅशनल (SBI) संस्थेचा उपक्रम : आठ संघात होणार सामने संघ व खेळाडू नोंदणी सुरू
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
श्री बसवेश्वर इंटरनॅशनल (SBI) संस्थेतर्फे लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातील समाज बांधवांकरीता कोल्हापुरात प्रथमच भव्य लिंगायत प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा आठ संघात खेळवण्यात येणार असून संघ व खेळाडू नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे., अशी माहिती स्पर्धा संयोजन प्रमुख मंजुनाथ साव्यानावर यांनी दिली आहे.
संघाची मालकी, प्रायोजकत्वसाठी स्पर्धा संयोजन समितीशी संपर्क साधावा
या स्पर्धा आठ संघात खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ व खेळाडू नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन स्पर्धा संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच समाजातील व्यापारी व्यावसायिक व उद्योजक यांना संघाची मालकी विकत घ्यायची असेल किंवा स्पर्धेचे प्रायोजकत्व घ्यायचे आहे. त्यांनी तत्काळ स्पर्धा संयोजन समितीशी संपर्क साधावा. तसेच संघ व खेळाडू नोंदणी, टीमची मालकी, प्रायोजकत्व स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठीही त्यांनी 86 240 62 260 / 74 47 87 88 88 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा., असे आवाहन स्पर्धा संयोजन प्रमुख मंजुनाथ साव्यानावर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पहिल्या ८० प्लेअर्सनाच संधी
लिंगायत प्रीमिअर लीग टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा खेळाडू नोंदणी फॉर्म पहिल्या ८० प्लेअर्सनाच संधी मिळेल. आत्ताच वरिल लिंक वर क्लिक करून फॉर्म भरून नाव नोंदणी करा.