*कंदमुळे आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शना” ला शानदार प्रारंभ
– ७० हून अधिक कंदमुळे व १६० हुन जास्त औषधी वनस्पस्ती प्रदर्शित
– प्रदर्शन रविवार ( ता २१ ) सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहणार
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी)
७० हून अधिक कंदमुळांचे आणि १६० हुन अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शनाला कोल्हापूर शहरात शहाजी कॉलेजच्या परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी शानदार प्रारंभ झाला. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. व्ही . एन . शिंदे , कुलसचिव , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. यावेळी संजय शिंदे , अतिरिक्त जिल्हाधिकारी, कोल्हापूर व बाबासाहेब वाघमोडे , प्रांताधिकारी , गडहिंग्लज यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार धनंजय महाडिक यांनीही प्रदर्शनाला विशेष भेट दिली.
वनस्पतींची माहिती आवर्जून घ्यावी
उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. वी . एन . शिंदे , कुलसचिव , शिवाजी विद्यापीठ ह्यांनी ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार आणि अभिनंदन केले. .गौतम बुद्धांची गोष्ट सांगून आयुष्यातील आपले झाडावरचे प्रेम त्यांनी झाडावरच्या एका कवितेतून व्यक्त करताना जिथे जिथे शकय असेल तिथे आपल्या अवतीभवती असणाऱ्या वनस्पतींची माहिती आवर्जून घ्यावी असे सर्वांना आवाहन केले.
– ७० हून अधिक कंदमुळांचे आणि १६० हुन अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन
निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. औषधी वनस्पती , रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी , शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने निसर्गअंकुर ‘ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था , चॅनल बी ,गार्डन क्लब कोल्हापूर, रोट्रॅक्ट – कोल्हापूर झोन ,मंजिरी कपडेकर कूकींग कलासेस , ईनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनिअल्स , युथ ऍनेक्स ,वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दि. २० आणि २१ जानेवारी २०२४ रोजी ७० हून अधिक कंदमुळांचे आणि १६० हुन अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन कोल्हापूर शहरात शहाजी कॉलेजच्या परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
१५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध
या प्रदर्शनात सताप , गुगुळ , कुसर , कोष्ट कोलीजंन , लक्ष्मी तरु , सागर गोटा , बेडकी पाला , अक्कल कारा , दमवेल , काजरा ह्या दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती तसेच कणगा ,काटे कणग ,कोराडू , करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल, आळसी , शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद इ . अशाप्रकारच्या सुमारे ७० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची तसेच १६० हुन अधिक औषधी वनस्पतीची मांडणी ह्या प्रदर्शनात केली गेली असून एकूण ७० कंदांच्या प्रकारांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध आहेत.
प्रदर्शन रविवार ( ता २१ ) सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहणार
कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रदर्शनाचा उद्देश आणि माहिती डॉ . मधुकर बाचुळकर यांनी उपस्थितांना दिली. यावेळी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ .आर .के. शानेदिवाण , मंजिरी कपडेकर, अभिजित पाटील , आरती रायगांधी , अमृता वासुदेवन , सुशांत टकळक्की , गार्डन क्लब चे सदस्य रोहिणी पाटील आणि भक्ती डकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिवार ( ता . २०) सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाला सुरुवात झाली असून रविवार ( ता २१ ) सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले राहणार आहे.