कोल्हापूर सकल मराठा मोर्चाचे स्वयंसेवक कार्यकर्त्यांची पहिली टिम मुंबईला रवाना
– न्याय लढ्यात कोल्हापूरकर नेहमीच आगृही
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी)
छत्रपती ताराराणी चौक येथे शुक्रवारी (दि 19) सायंकाळी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या नियोजनाची तयारीकरीता स्वयंसेवक व कार्यकर्त्यांची पहिली टिम तातडीने रवाना झाली.
घोषणांनी परिसर दणाणून सोडला…
मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या नियोजनासाठी जाणारी पहिली स्वयंसेवकांची टीम व सर्व कार्यकर्ते छत्रपती ताराराणी चौक येथे शुक्रवारी (दि 19) जमा झाले. यावेळी या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी जय जिजाऊ..,जय शिवराय…,एक मराठा लाख मराठा… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
न्याय लढ्यात कोल्हापूरकर नेहमीच आगृही
यावेळी प्रसाद जाधव ह्यांनी घोषणा केली की आता हा आरक्षण लढ्याचा अंतिम टप्पा असेल. वारंवार आम्ही सातत्याने मराठा आरक्षणावर आंदोलन केले आहे. आणि कोल्हापूरकर नेहमीच आगृही न्याय लढ्यात पुढे असतात. तसेच आजही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईधडक मोर्चामध्येही आजही आम्हीच पुढे असणार आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते रवाना झाले. आणखी काही दिवसांत महिलासह पुढील आणखी स्वयंसेवक व कार्यकर्त्यांच्या टिमा रवाना करण्याचे आयोजन आहे.
यावेळी उपस्थित स्वयंसेवक व कार्यकर्ते
यावेळी संजयसिंह साळोखे,वैभवराज राजे भोंसले, जितेंद्र पाटील,निलेश सुतार, हेमंत साळोखे, किशोर घाटगे, सुशांत सावंत, अनिकेत घोटणे, चारूशिला पाटील, गजानन पाटील,गणेश घाटगे,संजय पवार,नंदू घोरपडे,संकेत बुचडे, अजित सरनाईक, विकास सावंत,मंदार पोवार,श्रीहरी चिले,यश जाधव,सुमित विचारे, धैर्यशिल कोंडुसकर,श्रीधर पाटील,करण जाधव,,योगेश शेटके,अशोक पोवार, रमेश मोरे, प्रसन्न शिंदे, विक्रमसिंह जरग, गौरव लांडगे,संजय देसाई,लखन चोगुले, सचिन पास्ते, इत्यादी उपस्थित होते.