मुंबईत नियोजनाकरीता एक टिम आज होणार तातडीने रवाना
– सकल मराठाचे समन्वयक प्रसाद जाधव यांची माहिती
– मुंबईत धडक मोर्चच्या नियोजनाची तातडीची बैठक संपन्न
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी )
आज शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 एक टिम मुंबईत नियोजनाकरीता तातडीने रवाना होणार आहे. तेथे कोल्हापूरहून येणाऱ्या बांधवांची सोय करण्यात येणार आहे. तसेच मुंबईला येणाऱ्या बांधवांच्या वाहनांना सरकारने पूर्ण टोल माफी करण्यात यावी अन्यथा टोल न भरता बांधवांनी मार्गस्थ होतील, अशी माहिती सकल मराठाचे समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली.
मुंबईत धडक मोर्चच्या नियोजनाची तातडीची बैठक श्री अंबाबाई हॉलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला बोलताना समन्वयक प्रसाद जाधव यांनी ही सूचना व माहिती उपस्थितांना दिली.
संभाजीराजे यांना सर्वश्री पाठींबा
संजयसिंह साळोखे यांनी कोकण व इतर भागातून कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या बांधवांची जेवण व नाष्ट्याची तसेच राहण्याची सोय करण्यात येईल असे सांगितले. तसेच वैभवराज राजे भोंसले ह्यांनी मोर्चाची जागृती मुंबईमध्ये कोल्हापूर मधील बांधवांची मुंबईत सोयीचे नियोजन करण्यात येणार आहे नमूद केले. यावेळी हेमंत साळोखे ह्यांनी सांगितले की संभाजीराजे यांना सर्वश्री पाठींबा दिला असून सर्व प्रकारचे मदत करण्याची तयारी दर्शवली असलेले नमूद केले.
शौर्य पीठासह विविध संघटनांनी सहभाग
यावेळी किशोर घाटगे, संजय देसाई,चारूशिला पाटील ह्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जितेंद्र पाटील,श्रीकांत भोसले, हेमलता देसाई, सचिन पाटील, राजेंद्र तोरसेकर,सचिन पास्ते,प्रसन्न शिंदे, विक्रमसिंह जरग,लखन चौगुले, अशोक पवार, रमेश मोरे,सुशांत सावंत, योगेश शेटके, अनिकेत गोठणे, गणपती पाटील,संकेत बुचडे, अजित सरनाईक, हजर होते. यावेळी दोन शिष्टमंडळ (टीम) तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये अव्याहतपणे १० वर्षे सातत्याने आंदोलक करणार्या शौर्य पीठाच्या मार्फत, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जिल्हा कृती समिती, कोल्हापूर शहर कृती समितीसह विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.