टेक्नोमेट एंटरप्रायझेस इलेव्हन उपांत्य फेरीत
– कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कॄत “कै मुरलीधर सोमाणी ट्रा^फी” 19 वर्षाखालील थीम क्रिकेट स्पर्धा 2023 – 24.

– सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनवर  16 धावानी मात

– सामन्यात यतीराज पाटील (87 धावा) व पॄथ्वीराज निंबाळकर (53 धावा)  यांची अर्धशतके
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी).

शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या  जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कॄत “कै मुरलीधर सोमाणी ट्रॉफी” 19 वर्षाखालील थीम क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (दि. 13 जानेवारी 2024) झालेल्या सामन्यात टेक्नोमेट एंटरप्रायझेस इलेव्हनने सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनवर  16 धावानी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

टेक्नोमेट एंटरप्रायझेस इलेव्हनने 25 षटकांत सर्वबाद 182 धावा केल्या. यामध्ये  यतीराज पाटील 87, धैर्यशील पाटील 23, वासिम मुल्लाणी 20 धावा केल्या. सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनकडुन सुदेश कांबळे, पॄथ्वीराज निंबाळकर, रूद्र लोंढे व सिध्दार्थ कुभांर यांनी प्रत्येकी 2, सोहम काटकरने 1 बळी घेतला.

उत्तरादाखल खेळताना सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनने 24 षटकांत सर्वबाद 166 धावा केल्या. यामध्ये पॄथ्वीराज निंबाळकर 53, अलोक कानिटकर 33, अर्थव पोवार 20, सोहम काटकर 15, सिध्दार्थ झेंडे व रूद्र लोंढे यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. टेक्नोमेट एंटरप्रायझेस इलेव्हनकडुन प्रकाश कुमार, यतीराज पाटील व वर्जकुमार,  सावंत यांनी प्रत्येकी 2 , संस्कार जगदाळे, अभिजित निषाद व धैर्यशील पाटील यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. अशा प्रकारे टेक्नोमेट एंटरप्रायझेस इलेव्हन 16 धावानी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

You may also like

error: Content is protected !!