“लघु उद्योजक”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” व “शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा” साठी अर्ज करण्याचे आवाहन

- कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी वैशाली पाटील यांची माहिती

लघु उद्योजक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व *शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा* साठी अर्ज करण्याचे आवाहन

– (संग्रहित फोटो)

–  कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी वैशाली पाटील यांची माहिती

– *लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपूर्वी अर्ज करावेत*

– शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

– *शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा*  10 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत*

– राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ( संक्षिप्त )

—————————————————-

1)  *लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 जानेवारीपूर्वी अर्ज करावेत*

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकांकडून लघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्रास 31 जानेवारी 2024 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी केले आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अटी खालील प्रमाणे-

पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षास पात्र लघुउद्योग घटकांना देण्यात येतील. उदा. वैयक्तिक मालकास किंवा फर्मच्या भागिदारास किंवा खासगी मर्यादित कंपनीच्या कोणत्याही संचालकास जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे. तसेच उद्योग घटक संचालनालयाकडे/उद्योग खात्याकडे स्थायीरित्या लघुउद्योग म्हणून नोंदणीकृत झालेला असला पाहिजे. मागील तीन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे घटक या पुरस्कारास पात्र ठरतील. याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील ३ वर्षाची वर्षनिहाय माहिती अपेक्षित राहील. उद्योग घटकाची सर्वांगीण प्रगती झालेली असावी. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. उद्योग घटकास महाराष्ट्र शासनाचा किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा. पुरस्कार योजनेत यशस्वी उद्योग घटकांना अनुक्रमे १५ हजार व १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशंसापत्र, शाल व श्रीफळ पुरस्काराच्या स्वरुपात दिले जाणार आहे.
विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

—————————————————-

2) *शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत*

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षाच्या पुरस्कारासाठी 8 ते 22 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

पुरस्कारामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणा-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. 8 ते 22 जानेवारी दरम्यान 22 जानेवारी रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

—————————————————-
3) *शेतकऱ्यांसाठी परराज्याचा अभ्यास दौरा*

– 10 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत*

कोल्हापूर : प्रतिनिधी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतंर्गत शेतक-यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा राबविण्यात येत आहे. फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इ. बाबत प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी केले आहे.

दौ-यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान जाणुन घेता येणार आहे. या कार्यक्रमांतंर्गत राज्यात फलोत्पादन शेतक-यांसाठी तसेच शेतक-यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतुने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या मध्यामातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे यासाठी शेतक-यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. भिंगारदेवे यांनी दिली.

—————————————————-

4) जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) : राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ( संक्षिप्त )

दिनांक ४ जानेवारी २०२४

* नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा

( वित्त विभाग)

* अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये

( नगरविकास विभाग )

* दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.

( दुग्धव्यवसाय विकास)

* विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार

( जलसंपदा विभाग)

* मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.

( वित्त विभाग)

* पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा

( वस्त्रोद्योग)

* रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ

( वस्त्रोद्योग विभाग)

* द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार

( उद्योग विभाग)

* नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता

( परिवहन विभाग)

* सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला

( सहकार विभाग)

—————————————————-

You may also like

error: Content is protected !!