डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना “भारतभूषण” पुरस्कार जाहीर

- युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांची माहिती

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना “भारतभूषण” पुरस्कार जाहीर

– युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांची माहिती

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी).

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली व परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार *माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना “भारतभूषण” पुरस्काराने गौरवान्वित करून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.* अशी माहिती युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र संघचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी दिली आहे.

“चांगुलपणाची चळवळ”

“चांगुलपणाची चळवळ” या अभियानाअंतर्गत देशभर त्यांनी सामाजिक कार्य करणाऱ्या ४५०  पेक्षा अधिक संस्था सोडल्या आहेत. या त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवा व  सामाजिक लक्षवेधी देश पातळीवरील उल्लेखनीय जनसेवेच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

“पुरस्कार वितरण सोहळा 2024” चे आयोजन

शनिवार दि. 6 जानेवारी 2024 मराठी पत्रकार दिन आणि युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचा 14 वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून “पुरस्कार वितरण सोहळा 2024” चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर स्वागत अध्यक्ष उद्योगपती पारस ओसवाल असणार आहेत.

तसेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, खासदार प्रा संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, गोकुळचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, कोल्हापूर मनपा प्रशासक के मंजूलक्ष्मी, इचलकरंजी मनपा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे – पाटील, गोकुळ दूध संघचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, माजी नगरसेवक अशोकराव भंडारे, दिलीप पवार, कोमनपा माजी सभापती सत्यजित नाना कदम, राहुल चव्हाण, निर्मिती फिल्म क्लबचे अनिल म्हमाने ज्येष्ठ विधीज्ञ अँड. धनंजय पठाडे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, उद्योगपती अमर शिंगाडे आदींची पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.  या पुरस्कार वितरण सोहळ्याला युवा पत्रकार संघाचे राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी, पत्रकार सभासद व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!